By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 11:05 IST
1 / 7मनोरंजनविश्वात आनंदाचं वातावरण आहे. अनेक अभिनेत्री त्यांच्या आयुष्यात नवीन टप्प्यावर आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने गुडन्यूज दिली. लग्नानंतर ९ वर्षांनी ती आई होणार आहे.2 / 7तर तिच्यापाठोपाठ आणखी एका टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्रीनेही सोशल मीडियावर चाहत्यांना गुडन्यूज दिली. ही अभिनेत्री आहे करिश्मा तन्ना. 3 / 7करिश्मा तन्ना वयाच्या ४२ व्या वर्षी आई होणार आहे. २०२२ साली तिने वरुण बंगेराशी लग्नगाठ बांधली. तर आता लग्नानंतर ४ वर्षांनी ती आई होणार आहे. 4 / 7काही दिवसांपूर्वी सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये करिष्माने एक खुलासा केला. तिच्या पत्रिकेत मंगळदोष होता. ती म्हणालेली, 'पत्रिकेतील मंगळदोष दूर करण्यासाठी मला बऱ्याच गोष्टी कराव्या लागल्या. माझं लग्न झाडाशी करण्यात आलं होतं जेणेकरुन दोष निघून जाईल.'5 / 7'माझं लग्न एका देवतेशीही करण्यात आलं होतं. या अशा गोष्टी कशासाठी करायच्या हे तेव्हा मला समजत नव्हतं. मी तेव्हा खूप लहान होते. पण माझ्या आईचा या सगळ्यावर विश्वास होता.'6 / 7'माझी आई पत्रिका मानते. म्हणूनच मलाही त्याबद्दल माहित आहे. आईमुळेच माझ्या हातात माझी जन्मपत्रिका आली कारण तिला साडेसातीबद्दलही कल्पना होती. त्यामुळे ती आधीच मला यावरचे उपाय सांगायची.'7 / 7'मी लवकर लग्न करावं आणि मला चांगला नवरा मिळावा अशी तिची इच्छा होती. म्हणून तिने माझा मंगळदोष दूर करण्यासाठी बरेच प्रयत्न केले.'