Join us
Daily Top 2Weekly Top 5

एक सुपरहिट सिनेमा अन् इंडस्ट्रीतून गायब झाली अभिनेत्री, करोडपती बिझनेसमनसोबत थाटला संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 17:41 IST

1 / 8
मनोरंजनविश्वात एकच सिनेमा देऊन रातोरात हिट होणारे अनेक कलाकार आहेत. मात्र बरेच कलाकार हे तेवढा एकच सिनेमा करुन गायबही झाले.
2 / 8
अशीच एक अभिनेत्री जी शाहरुख खानसोबत सुपरहिट सिनेमात झळकली. मात्र नंतर तिने फिल्मी जगापासून लांब राहणंच पसंत केलं.
3 / 8
२००४ साली आलेल्या 'स्वदेस' मध्ये शाहरुखसोबत दिसलेली अभिनेत्री आठवतेय? ती आहे गायत्री जोशी..तिचा हा पहिलाच सिनेमा होता.
4 / 8
गायत्री जोशीने १९९९ साली 'मिस इंडिया ब्युटी कॉन्टेस्ट'मध्ये सहभागी घेतला होता. यात ती टॉप ५ पर्यंत पोहोचली होती. नंतर तिने काही म्युझिक व्हिडीओ केले.
5 / 8
२००५ साली तिने बिझनेसमन विकास ओबेरॉयसोबत लग्न केलं. यानंतर ती घर संसारातच रमली.
6 / 8
विकास ओबेरॉय अरबपती आहेत. त्यांची नेटवर्थ ४५० कोटी असल्याचं काही रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. ओबेरॉय रियल्टी लिमिटेडचे ते चेअरमन आणि एमडी आहेत. तसंच एअरक्राफ्ट कंपनीचे मालक आहेत.
7 / 8
२०२३ साली गायत्री जोशी चर्चेत आली होती. इटलीमध्ये ती आणि विकास ओबेरॉय लॅम्बॉर्गिनी चालवत होते तेव्हाच त्यांचा अपघात झाला. त्यांची लॅम्बॉर्गिनी फेरारीला धडकली. यात एका वृद्ध स्वीस जोडप्याचा मृत्यूही झाला होता. तर गायत्री आणि विकास थोडक्यात वाचले होते.
8 / 8
त्यांच्यावर बेजबाबदारपणे कार चालवल्याचा आरोप झाला होता. मात्र नंतर ते सुरक्षित मुंबईत परतले होते.
टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडशाहरुख खान