By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 12:33 IST
1 / 9 दिव्या भारती हे हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेलं स्वप्नन जणू. वयाच्या अवघ्या १९ वर्षी तिने सिनेसृष्टीतील सर्वांची मनं जिंकली होती. दिव्या भारती ही बॉलिवूडची खूप सुंदर आणि तेवढीच उत्तम अभिनय करणारी अभिनेत्री होती. नाव, पैसा, स्टारडम सगळं मिळालं. मात्र वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला.2 / 9 विश्वात्मा हा हिंदीतला तिचा पहिला सिने राजीव राय यांनी तिला या चित्रपटातून हिंदीत ब्रेक दिला. यामधील “सात समंदर पार तेरे ” या दिव्यावर चित्रित केलेल्या गाण्यानं तर धमालच केली होती. त्यानंतर शोला और शबनमनं तिच्या विजयात आणखी भर घातली.यात दिव्या आणि गोविंदा जोडी जमली होती.3 / 9याशिवाय शाहरुख खान ऋषी कपूर यांच्याबरोबर दिवाना सिनेमानंतर तर तिने सर्व अभिनेत्रींना मागं टाकलं. शाहरुख खान बरोबरच्या या चित्रपटानं तिला यश तर दिलच पण त्यावेळी ती सर्वात मोठी स्टारही झाली होती. या चित्रपटानंतर तिचा इंडस्ट्रीत दबदबा निर्माण झाला आणि दिव्याचं मानधन २५ लाखांवर गेलं होतं असं सांगितलं जातं. म्हणजे त्यावेळी टॉपवर असलेल्या श्रीदेवी, माधुरी यांच्यापेक्षा जास्त मानधन ती घेऊ लागली.4 / 9दिव्याने आजवर हिंदीत जवळपास १३ ते १४ चित्रपट केले. त्यातले काही सुपर डुपर हिट झाले तर काही जेमतेम चालले.पण तीनं त्यावेळच्या सर्व प्रस्थापित अभिनेत्रींच्या स्टारडमला टक्कर दिली होती.5 / 9हिंदी चित्रपटसृष्टीत येण्याआधी दिव्या भारतीने तेलुगु चित्रपटसृष्टीतून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. प्रसिद्ध निर्माते डी रामानायडू यांनी मुलगा व्यंकटेश यांच्याबरोबरच्या “बोब्बीली राजा ” या चित्रपटातून हिरोईन म्हणून दिव्या नावारुपाला आली. हा तिचा चित्रपट सुपरहिट ठरला.6 / 9 त्यानंतर दिव्यासाठी हिंदी सिनेसृष्टीचे व्दार खुले झाले. असं सांगितलं जातं, अवघ्या १४ वर्षी तीला चित्रपटासाठी विचारण्यात येत होतं. त्यावेळची सुपरस्टार श्रीदेवी हिच्या चेह-याशी थोडीफार मिळती जुळती असल्यामुळे तिला खूप ऑफर येऊ लागल्या होत्या.7 / 9 शोला और शबनम, दिल आशना है, दिवाना, विश्वात्मा, शोला और शबनम, रंग, दुश्मन जमाना, क्षत्रिय अशा एकाहून एक सरस सिनेमांमध्ये तिने काम केलं होतं.8 / 9शोला आणि शबनम पासून झालेली निर्माता साजिद नाडियाडवालाशी ओळख हळू हळू प्रेमात बदलली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. साजिदशी लग्न करण्याकरिता दिव्याने मुस्लिम धर्म स्वीकारला आणि 10 मे 1992 ला त्यांचे लग्न झालं.9 / 9लग्नानंतर एकाच वर्षात 5 एप्रिल 1993 ला दिव्याचा वर्सोवातील तुलसी भवन अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू झाला. आजही तिचा मृत्यूचं रहस्य कायम आहे.