Join us
Daily Top 2Weekly Top 5

"कसलाच संकोच...", ८ लोकांसमोर दिलेला इंटिमेट सीन! अभिनेत्रीने सांगितला शूटिंगचा 'तो' अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 11:46 IST

1 / 7
सिनेमा, सीरिजमध्ये इंटिमेट सीन असणं हे आता काही नवीन नाही. अभिनेत्रींना अनेकदा इंटिमेट सीन्स देताना अनकंफर्टेबल वाटतं.
2 / 7
एका अभिनेत्रीने नुकताच तिच्या शूटिंगचा अनुभव सांगितला. त्यात तिने ८ लोकांसमोर इंटिमेट सीन केला होता. मात्र यावेळी तिला काहीच संकोच वाटला नाही असं ती म्हणाली.
3 / 7
ही अभिनेत्री आहे डेजी शाह. बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत तिने वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यातील काही गोष्टींवर भाष्य केलं. तिने 'हेट स्टोरी ३' मधील तिच्या बोल्ड सीन्सवरही प्रतिक्रिया दिली.
4 / 7
'हेट स्टोरी ३' सारखा बी ग्रेड सिनेमा का निवडला? यावर ती म्हणाली, 'जय हो सिनेमानंतर माझी एक इमेज बनली होती. मी हॉट नाही असं फिल्ममेकर्सला वाटायचं त्यामुळे मला एकसारखेच रोल ऑफर होत होते.'
5 / 7
'माझ्यासाठी तो मेंटल बॅरियर ब्रेक करणं गरजेचं होतं. म्हणूनच मी हेट स्टोरी ३ सिनेमा केला. मी अशाही भूमिका करु शकते हे मला दाखवून द्यायचं होतं.'
6 / 7
'सिनेमात बोल्ड सीन्स होते. आज सेटवर इंटिमसी कोऑर्डिनेटर असतात. पण आमच्यावेळी ते नव्हते. असे सीन करताना मर्यादा आखून दिली जायची. कोस्टारसोबत आधी बातचीत केली जायची आणि ते कशात कंफर्टेबल आहेत किंवा नाहीत हे पाहिलं जायचं.'
7 / 7
'एकमेकांच्या लिमिटचा आदर केला जायचा. माझ्यासाठी इंटिमेट सीन शूट करणं सोपं गेलं. दिग्दर्शक विशाल पांडे असे सीन शूट करताना सेटवर कायम गरजेचाच क्रू उपस्थिती असेल याची काळजी घ्यायचे. त्यामुळे सिनेमात इंटिमेट सीन करताना सेटवर ७-८ लोकच होते.'
टॅग्स :डेझी शहाबॉलिवूड