Join us

सौंदर्य असं की अप्सराच जणू! लोकप्रिय अभिनेत्रीच्या लेकीवर खिळल्या नजरा, ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 17:14 IST

1 / 8
अभिनेत्री भाग्यश्री आणि सलमान खान यांचा 'मैने प्यार किया' हा पहिलाच सिनेमा होता. या सिनेमातून भाग्यश्री आपल्या सौंदर्यामुळे आणि निरागस अभिनयामुळे लोकप्रिय झाली.
2 / 8
आजही वयाच्या ५६ व्या वर्षीही ती फिटनेस आणि सौंदर्याच्या बाबतीत तरुणींनाही टक्कर देते. 'मैने प्यार किया' हिट झाल्यानंतर तिला खरं अनेक ऑफर्स आल्या. मात्र ती हिमालय दसानी यांच्या प्रेमात होती. १९८९ मध्येच ती लग्नबंधनाच अडकली.
3 / 8
भाग्यश्रीला अभिमन्यू हा मुलगा आणि अवंतिका ही मुलगी आहे. या दोघांनीही आईच्या पावलावर पाऊल ठेऊन अभिनयात पदार्पण केलं आहे.
4 / 8
भाग्यश्रीची लेक अवंतिका दिसायला कमी सुंदर नाही. २०२२ साली तिने 'मिथ्या' या सिनेमातून पदार्पण केलं. नंतर तिने 'नेनू स्टुडंट सर','इन गलियो मे' या सिनेमांमध्ये काम केलं.
5 / 8
अवंतिकाचं सौंदर्याची चाहत्यांनी थेट अप्सरेशीच तुलना केली आहे. गोड, निरागस चेहरा आणि एकदम फिट लूकमध्ये ती नेहमी दिसली आहे.
6 / 8
पारपंरिक असो किंवा वेस्टर्न तिने प्रत्येक स्टाईल आत्मविश्वासाने कॅरी केली आहे. तिचे सोशल मीडियावर एक लाखापेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत.
7 / 8
अवंतिका केलेला मराठमोळा लूकही तिला खूप शोभून दिसतोय. पिवळी साडी, लाल ब्लाऊज आणि केसांचा अंबाडा त्यावर माळलेला गजरा यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे.
8 / 8
भाग्यश्री माहेरची पटवर्धन म्हणजेच मराठी कुटुंबात जन्माला आली आहे. त्यामुळे तिच्या मुलांवरही महाराष्ट्रीय संस्कार झाले आहेत.
टॅग्स :भाग्यश्रीबॉलिवूड