1 / 7सध्या रणवीर सिंह आगामी 'धुरंधर' सिनेमामुळे चर्चेत आहे. यामध्ये तो अभिनेत्री सारा अर्जुनसोबत रोमान्स करणार आहे. सारा फक्त २० वर्षांची असून रणवीर सिंह ४० वर्षांचा आहे. दोघांमध्ये २० वर्षांचं अंतर आहे.2 / 7नवाजुद्दीन सिद्दीकीनेही २८ वर्ष लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स केला होता. २०२३ साली आलेल्या 'टीकू वेड्स शेरु' सिनेमात अवनीत कौरसोबत दिसला. यावेळी नवाजुद्दीन ४९ वर्षांचा होता तर अवनीत फक्त २१ वर्षांची होती. 3 / 7अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लरचा 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमा २०२२ साली रिलीज झाला होता. यावेळी अक्षय कुमार ५४ वर्षांचा होता तर मानुषी छिल्लर २५ वर्षांची होती. दोघांमध्ये २९ वर्षांचं अंतर होतं. 4 / 7सलमान खानचीही कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत जोडी जमली होती. आता नुकत्याच आलेल्या 'सिकंदर' मध्ये तो ३० वर्ष लहान रश्मिका मंदानासोबत दिसला. 5 / 7तर ४ वर्षांपूर्वी आलेल्या 'राधे' सिनेमात २७ वर्ष लहान दिशा पटानीसोबत त्याने रोमान्स केला6 / 7या यादीत अमिताभ बच्चन यांचंही नाव येतं. वयाच्या ६३ व्या वर्षी ते ३० वर्ष लहान शेफाली शाहसोबत वक्त सिनेमात दिसले होते. यात ते नवरा बायकोच्या भूमिकेत होते. 7 / 7'ब्लॅक' या गाजलेल्या सिनेमात बिग बींनी ३५ वर्ष लहान राणी मुखर्जीसोबत किसींग दिला होता. तर नि:शब्द सिनेमात त्यांनी जिया खानसोबत किसींग सीन दिला. तेव्हा जिया फक्त १९ वर्षांची होती. तर अमिताभ बच्चन ६५ वर्षांचे होते. दोघांमध्ये ४६ वर्षांचं अंतर होतं.