Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रभुदेवाच्या प्रेमात आकंठ बुडालेली 'ही' अभिनेत्री, प्रेमासाठी धर्मही बदलला, पण...; कुठे बिनसलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 16:53 IST

1 / 9
प्रभुदेवाचा जन्म म्हैसूर कर्नाटक येथे 3 एप्रिल 1973 ला झाला. वडील मुगुर सुन्दर हे दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नृत्यदिग्दर्शक होते. वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत नृत्य क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं. भरतनाट्यम्, कथक यासारख्या भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार व पाश्‍चिमात्य नृत्यशैलीत तो पारंगत आहे. भारतातील सर्वोत्कृष्ट नृत्यकलाकार म्हणून अल्पावधीतच प्रभूदेवा ओळखले जाऊ लागले. आधुनिक नृत्यप्रकारांची हिंदी चित्रपटसृष्टीला ओळख करुन देण्याचे श्रेय सुद्धा त्याच्याकडे जाते.
2 / 9
प्रभुदेवाचा नृत्यदिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट वेत्री विझा (1989) हा होता. या आधी पार्श्‍वनर्तक म्हणून त्यांनी अग्नि नत्चाथिरम या तामिळ चित्रपटात काम केले होते. पहिल्याच चित्रपटापासून मिळालेला प्रसिध्दीचा प्रवास आज १०० हून अधिक चित्रपटांच्या नृत्यदिग्दर्शनापर्यंत येऊन पोहोचला आहे.
3 / 9
अभिनेता म्हणून पहिली संधी तामिळ चित्रपट इन्धू (1994) या चित्रपटात त्याला मिळाली. चित्रपटाचे दिग्दर्शक होते पवविथारन. या चित्रपटात त्यांच्या नृत्यकौशल्याचा पूरेपूर वापर दिग्दर्शकाने करुन घेतला.
4 / 9
या तामिळ चित्रपटातील ए.आर.रहमानचे संगीत आणि प्रभुदेवा याच्या नृत्याने नटलेले मुक्‍काबल आणि उर्वसी उर्वसी ह्या गाण्यांमुळे प्रभुदेवाची प्रसिध्दी संपूर्ण भारतात पसरली. यामुळे प्रभुदेवाकरिता हिंदी चित्रपटसृष्टीची दारे उघडी झाली.
5 / 9
यानंतर यशानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. मग रसाइया व ए.आर.रहमानच्या संगीताने सजलेले लवबर्ड, श्री रोमिओ हे दोन चित्रपटांनी एक यशस्वी अभिनेता व नृत्यकलाकार म्हणून प्रेक्षकांनी प्रभुदेवाला स्वीकारलं. एक यशस्वी अभिनेता आणि नृत्यदिग्दर्शक म्हणून प्रभुदेवाने वेट्री विज्ह, तमिल, ट्रकचालक, प्रतिबंध, कुली नंबर 1, धराने मोगुडू, अल्लरी अल्लूडू, मॅकेनिक अल्लुडु हे तामिळ तर हिंदीमध्ये राजाबाबू, हॅलो ब्रदर, मुंबई, ए.बी.सी.डी., वॉन्टेड, राऊडी राठौड, आर राजकुमार, अ‍ॅक्शन जॅक्सन हे चित्रपट केलेत. 1999 मध्ये प्रभुदेवाने शोभना आणि ए.आर.रहमान यांच्यासोबत म्युनिच (जर्मनी) येथे मायकल जॅक्सन अ‍ॅण्ड फ्रेंडस या समारंभात आपले नृत्यकौशल्य सादर केले.
6 / 9
प्रभुदेवाच्या नृत्याचे चाहते जगभरात आहेत. पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहीत आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा हिच्यामुळे प्रभुदेवाचं लग्न मोडलं असं म्हटलं जातं.
7 / 9
नयनतारा हिचे प्रभुदेवावर खूप प्रेम होते. या प्रेमापोटी तिने ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला. बरेच वर्ष हे दोघं लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते. प्रभुदेवाचे रामलता यांच्याशी लग्न झाले होते. नयनताराशी असलेले संबंध उघडकीस आल्यानंतर संतापलेल्या रामलता यांनी २०१० कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली. त्याचबरोबर नयनतारापासून दूर राहण्यासाठी प्रभुदेवावर दबाव टाकण्यास सुरुवात केली.
8 / 9
काही दिवसांनी हा वाद विकोपाला गेला आणि रामलता यांनी उपोषणाची धमकी दिली. तर अनेक महिला संघटनांनी नयनताराविरोधात आवाज उठवला. अखेरीस प्रभुदेवाने पत्नी रामलता यांना घटस्फोट दिला. मात्र त्यानंतर नयनताराने प्रभुदेवा आणि तिच्यात कोणताही संबंध नसल्याचं प्रसारमाध्यमांमध्ये स्पष्ट केले. त्यांना तीन अपत्ये आहेत. २००८ मध्ये त्यांच्या एका मुलाचे कर्करोगाने निधन झाले.
9 / 9
प्रभुदेवाने २००५ मध्ये दिग्दर्शनात पाऊल ठेवले. नुव्वानाटे नेनोडटना या तेलगू चित्रपटाने त्यांनी दिग्दर्शनास सुरुवात केली.नृत्यदिग्दर्शनात प्रभूदेवाला मिन्सारा कनावु आणि लक्ष्य या चित्रपटांकरिता राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. २०१९ मध्ये प्रभूदेवाला भारतातील मानाचा सन्मान पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
टॅग्स :प्रभू देवाबॉलिवूडसेलिब्रिटी