Join us

बॉलिवूड अभिनेत्याला SBI कडून मिळतात दरमहा १८ लाख ९० हजार रुपये, काय केलाय जुगाड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 14:56 IST

1 / 10
बॉलिवूडमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत, जिथे कलाकार केवळ अभिनयावर नाही, तर गुंतवणुकीतूनही कमाई करताना दिसतात.
2 / 10
असाच एक बॉलिवूड अभिनेता आहे, ज्याला देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) दरमहा १८.९० हजार रुपये देते.
3 / 10
विशेष बाब म्हणजे ही रक्कम त्यानं कुठल्याही गुंतवणूक योजनेतून नाही, तर एका स्मार्ट रिअल इस्टेट डिलमधून मिळवली आहे.
4 / 10
तर तो अभिनेता आहे, अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan). महानायक अमिताभ बच्चन यांचा लेक प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंटमधून नियमित कमाई करतो.
5 / 10
मीडिया रिपोर्टनुसार, अभिषेक बच्चननं मुंबईच्या जुहू परिसरात असलेला 'अम्मू अँड वत्स' बंगल्याचा तळमजला स्टेट बँक ऑफ इंडियाला भाड्यानं (Abhishek Bachchan Lease Juhu Property To SBI) दिला आहे.
6 / 10
'अम्मू अँड वत्स' बंगल्याच्या तळमजल्यावर एसबीआयनं त्यांची शाखा सुरू केली आहे. त्यासाठी दरमहा १८ लाख ९० हजार रुपये अभिषेकच्या खात्यावर जमा केले जातात.
7 / 10
हा भाडेकरार २८ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात आला होता. त्याचा कालावधी तब्बल १५ वर्षांचा आहे. म्हणजेच, पुढील दशकभराहून अधिक काळ एसबीआय या प्रॉपर्टीचा वापर करणार आहे.
8 / 10
विशेष म्हणजे या करारात दर ५ वर्षांनी भाडं वाढवण्याची अट स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे. ५ वर्षांनंतर, हे भाडं २३.६ लाख रुपये आणि १० वर्षांनंतर २९.५३ लाख रुपये पर्यंत वाढू शकते.
9 / 10
एसबीआयनं या करारासाठी आधीच २.२६ कोटी रुपये ठेव रक्कम म्हणून दिली आहे. याप्रकारे अभिषेक बच्चन आपल्या हुशारीनं महिन्याला लाखो कमावतो.
10 / 10
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेक बच्चनची एकूण संपत्ती सुमारे २८० कोटी आहे. अभिनयाव्यतिरिक्त, तो अनेक मोठ्या ब्रँडचा ॲम्बेसेडर देखील आहे, ज्यामुळे त्याचे उत्पन्न वाढते. तसेच अभिषेक प्रत्येक चित्रपटासाठी सुमारे १० ते १२ कोटी रुपये घेतो.
टॅग्स :अभिषेक बच्चनअमिताभ बच्चनएसबीआयसेलिब्रिटीमुंबई