By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 17:21 IST
1 / 13आशिकी गर्ल म्हणून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री अनु अग्रवाल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. अनु अग्रवाल आता ५३ वर्षांची आहे. 2 / 13एका अपघातानंतर तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. त्यानंतर ती सिनेइंडस्ट्रीपासूनही दूरावली होती. 3 / 13अपघातामुळे तिचा चेहरा बदलला गेला होता ज्यामुळे तिला ओळखणे खूप कठीण झाले होते. आता अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आलीय. यावेळी तिने प्रेम आणि सेक्सविषयी मोठे विधान केले आहे. 4 / 13अनु अग्रवाल अपघातानंतर एक मेंटल हेल्थ फाऊंडेशन चालवते. अनु अग्रवालने प्रेम आणि सेक्सविषयी एका मुलाखतीत सांगितले की, माझ्या शारिरीक गरजा खूप आधीच संपल्या आहेत. 5 / 13मला एनजीओच्या मुलांकडून खूप प्रेम मिळते. हे प्रेम खूप पवित्र आणि निरागस आहे. त्यामुळे आता माझ्यासाठी प्रेमाची परिभाषा बदलली आहे. 6 / 13ती पुढे म्हणाली की, छोट्या छोट्या गोष्टींमधूनही प्रेम मिळते. त्यामुळे सेक्स आणि प्रेम या गोष्टींना मी सारखे नाही मानत.7 / 13१९९९ साली अनु अग्रावालचा कार अपघात झाला होता. त्यानंतर ती तब्बल २९ दिवस कोमामध्ये होती. अपघातानंतर तिचे करिअर संपुष्ठात आले होते. त्यामुळे ती सिनेइंडस्ट्रीतून दूर गेली होती. 8 / 13सध्या मेंटल हेल्थ फाऊंडेशनमध्ये व्यग्र असते. काही दिवसांपूर्वी ती इंडियन आयडल शोमध्ये सहभागी झाली होती. मात्र तिचे काही सीन यामधून डिलीट केल्याचा आरोप तिने केला होता. 9 / 13त्यामुळे इंडियन आयडल शो चांगलाच ट्रोल झाला होता. त्यावेळी ती खूप चर्चेत आली होती.10 / 13अनु अग्रवालचा जन्म ११ जानेवारी १९६९ रोजी नवी दिल्लीत झाला होता. ती दिल्ली विद्यापीठात समाजशास्त्रात सुवर्णपदक विजेती होती. 11 / 13मॉडेलिंगनंतर तिने १९९० साली महेश भट यांच्या 'आशिकी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.12 / 13त्यानंतर सिनेइंडस्ट्रीत तिची मागणी खूप वाढली होती. 13 / 13या चित्रपटानंतर तिला सर्वजण 'आशिकी गर्ल' म्हणून ओळखू लागले होते.