Join us

चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 14:39 IST

1 / 12
६८ वर्षीय अभिनेत्री नफिसा अली यांना पुन्हा कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती त्यांनी काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना दिली.
2 / 12
२०१८ मध्ये पहिल्यांदा नफिसा अली यांना पहिल्यांदा स्टेज ३ पेरिटोनियल कॅन्सरचं निदान झालं होतं. २०१९ मध्ये कॅन्सर फ्री झाल्या होत्या. आता त्यांना पुन्हा स्टेज ४ पेरिटोनियल कॅन्सरचं निदान झालं आहे.
3 / 12
नफिसा अली यांनी 'द क्विंट'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी पहिल्यांदा कॅन्सरचं निदान झाल्याच्या प्रवासाबद्दल खुलासा केला. नफिसा म्हणाल्या, 'काहीतरी होतंय हे मला जाणवत होतं'.
4 / 12
'मी गोव्यात रोज चालायला जायचे. पण मला अचानक थकवा जाणवू लागला होता. तेव्हा मला जाणवलं की हे नॉर्मल नाही. मी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला. पण, गंभीर काहीच नाही, असंच डॉक्टरांचं म्हणणं होतं'.
5 / 12
'मी पुन्हा रेडिओलॉजिस्टकडे गेले आणि पुन्हा स्कॅनचे रिपोर्ट तपासायला सांगितलं. मी रडायला लागले आणि त्यांना म्हणाले की मला माहीत होतं काहीतरी गडबड आहे'.
6 / 12
'सुरुवातीला डॉक्टरांनी टीबी असल्याचं सांगितलं होतं. पण, मी त्यांना PET करण्यास सांगितलं. मी डॉक्टरांसोबत ५ रुपयाची पैज लावली होती'.
7 / 12
'जेव्हा रिपोर्ट आले तेव्हा ते नि:शब्द होते. मला टीबी झालेला नव्हता. तर कॅन्सर होता. मी प्रत्येकाकडून ५ रुपये घेतले, पण ते दु:खी होते'.
8 / 12
'कॅन्सर मार्कर टेस्ट उपलब्ध आहेत. कुठेही पैसे घालवू नका. चुकीच्या पद्धतीने झालेली बायोप्सी ही सगळयात वाईट गोष्ट आहे'.
9 / 12
'ते ट्युमरला सुई टोचतात. जर ते योग्य पद्धतीने झालं नाही तर शरीरात कॅन्सर पसरतो. मलाही अशाच प्रकारे स्टेज ३चा कॅन्सर झाला'.
10 / 12
स्वत:ला आलेल्या अनुभवामुळे आता नफिसा कॅन्सरबाबात जनजागृती करत आहेत. 'CA 125 ही टेस्ट उपलब्ध आहे जी फक्त १२०० रुपयांत होते. ज्यामुळे कॅन्सरचं निदान होण्यास मदत होते', असं त्या म्हणाल्या.
11 / 12
'मला याबद्दल कोणीही सांगितलं नाही. त्याऐवजी त्यांनी मला PET स्कॅन करण्यास सांगितलं ज्यासाठी २५ हजार रुपये लागले'.
12 / 12
'म्हणून मी आता लोकांची मदत करत आहे. तुम्हाला काही वाटत असेल तर मार्कर टेस्ट करा. पण, माझ्यासारखा मूर्खपणा करू नका'.
टॅग्स :नफीसा अलीकर्करोगकॅन्सर जनजागृती