Join us

5928_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 15:14 IST

गेल्या दशकात अनेक नव्या घडामोडी घडल्या आणि शोध लागले. मंगळ ग्रहावर काय आहे, त्याशिवाय स्वत:च चालणारी गाडी यांचा यात समावेश आहे. या काळात घडलेल्या घडामोडींची माहिती या ठिकाणी देत आहोत. यामध्ये अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत, ज्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुढे आल्या. या कोणत्या गोष्टी आहेत, त्याचा हा घेतलेला आढावा.

गेल्या दशकात अनेक नव्या घडामोडी घडल्या आणि शोध लागले. मंगळ ग्रहावर काय आहे, त्याशिवाय स्वत:च चालणारी गाडी यांचा यात समावेश आहे. या काळात घडलेल्या घडामोडींची माहिती या ठिकाणी देत आहोत. यामध्ये अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत, ज्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुढे आल्या. या कोणत्या गोष्टी आहेत, त्याचा हा घेतलेला आढावा.फ्युजन रिअ‍ॅक्टर या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. दोन हायड्रोजन आयसोटोप, ड्युटेरियम आणि ट्रिटीयम यांच्यातील संयुगानंतर ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा निर्माण होण्यासाठी सामान्य तापमानापेक्षा दहा पट अधिक तापमानाची गरज असते. या तापमानाला इलेक्ट्रॉन केंद्रकापासून मुक्त होते. यामुळे अत्यंत उष्ण आणि ऊर्जेमुळे गॅस प्रभारित होतो, त्याला प्लाजमा असे म्हणतात. मोठे चुंबक वापरुन हा प्लाजमा निहीत करण्यात येतो आणि अभिक्रिया करुन न्यूट्रॉन्स तयार होतो. यामुळे टबाईनला ऊर्जा मिळते, त्यापासून वीज तयार होते. येत्या काळात स्वच्छ ऊर्जा मिळण्यासाठी फ्युजन रिअ‍ॅक्टर्सचा वापर होईल. सध्या असणारी लोकसंख्या पाहता येत्या काळात अधिक प्रदूषणविरहित ऊर्जेची गरज भासणार आहे. त्यासाठी याचा वापर होऊ शकतो.शरीरातील अवयव काम करणे सोडल्यानंतर पुढे काय हा प्रश्न येत्या काळात पडणार नाही, अशी मानवाला अपेक्षा आहे. स्कॉटलंडमधील एडिनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी यावर संशोधन केले आहे. उंदरावर याबाबत प्रयोग करण्यात आले. उंदराच्या गर्भातून पेशी काढून रोगप्रतिकारक शक्तीसाठी याचा वापर करण्यात आला. ही पेशी प्रयोगशाळेतील उंदराला देण्यात आली. त्याचे परिणाम चांगले दिसून आले. अर्थात मानवावर हा प्रयोग करता आलेला नाही. सध्या प्रयोगशाळेत रक्तवाहिनी, श्वासनलिका, मुत्राशय यावर प्रयोग करण्यात येत आहेत. रुग्णाच्या स्वत:च्या पेशीचा वापर करण्याचेही प्रयोग सुरू आहेत.ज्यावेळी आपण बंदुकीची गोळी झाडतो त्यावेळी कार्यक्षेत्र, गोळीच्या फैरी, गुरुत्वाकर्षण, वाºयाचा वेग, आर्द्रता किंबहुना पृथ्वीची फिरण्याचा वेग याचा विचार करतो. गोळी झाडणे आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम याच्यातील अंतर कसे कमी होईल, याचीही काळजी घेतो. येत्या काळात निशाणेबाजी करताना आपले लक्ष एकदा ठरविले आणि ट्रिगर दाबला की संपले. डीएआरपीए या संस्थेने आणखी एक महत्वाची कामगिरी केली आहे. एक्झॅक्टो नावाने स्वत:च्या मार्गदर्शनाखाली चालणारी गोळी तयार केली आहे. हे असे एक तंत्रज्ञान आहे, जे स्वत:च मार्गदर्शन करते. मध्येच ते वळण घेऊ शकते. २००० मीटरच्या अंतरापर्यंत हे वापरता येते.अंध व्यक्तींना आपणास आजूबाजूचे दिसावे या उद्देशाने शास्त्रज्ञांनी ८० वर्षीय रेन फ्लॅन या ब्रिटीश नागरिकावर प्रयोग केले. जून महिन्यात दीड लाख डॉलर्स इतक्या किमतीचे अर्ग्युस २ नावाचे यंत्र डोळ्यात बसविले. यामुळे त्याला लोकांच्या आकृत्या आणि प्रतिकृती दिसू लागल्या. डॉ. पाऊलो स्टाँगा यांनी यावर काम केले आहे. कॅलिफोर्निया येथील सेकंड साईट मेडिकल प्रॉडक्ट यांनी अर्ग्युस २ ची निर्मिती केली.स्टार वॉर्समध्ये टीआयई फायटर्स आणि दुष्ट साम्राज्य यांच्यात दोन आयन इंजिनच्या माध्यमातून युद्ध होते. शास्त्रज्ञांनी तयार केलेले आयन इंजिन हे चित्रपटापेक्षा अधिक शक्तीशाली आहे. डाऊन स्पेसक्राफ्ट ० ते ६० प्रतिमैल इतक्या वेगाने चार दिवसात जाते. नासाने १९५९ साली हे इंजिन तयार केले होते. डीप स्पेस वन आणि डाऊन स्पेसमध्ये ते बसविण्यात आले. डीप स्पेस १ द्वारा प्रतिसेकंद ४.५ किलोमीटर इतक्या वेगाने २६३ दशलक्ष किलोमीटर इतके अंतर कापले.