Amitabh Bachchan 80th Birthday: अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्या बॉलिवूडमधील प्रवासाबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 17:43 IST
1 / 6बॉलिवूडचे शेहनशहा, बिग बी अमिताभ बच्चन आज आपला ८०वा वाढदिवस साजरा करतायेत. 2 / 6 कुणी त्यांना ‘अँग्री यंग मॅन’, कुणी ‘सुपरमॅन ऑफ द सेंच्युरी’, कुणी ‘बिग बी’ तर कुणी ‘शहेनशह’ म्हणतात. बिग बी सध्या वयाच्या तिसऱ्या इनिंगमध्ये आहेत. परंतु आजही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे. 3 / 6आजही ते चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारत आहेत. बॉलिवूडमध्ये 7 नोव्हेंबर 1969 रोजी पदार्पण केल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.4 / 6 तरुण, वृद्ध, माहिला, पुरुष सर्व वर्गातील त्यांच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले तरी ते थांबले नाही.5 / 611 ऑक्टोबर 1942 रोजी अलाहाबाद येथे जन्मलेल्या अमिताभ यांनी 1969 मध्ये सात हिंदुस्तानी या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.6 / 6पण त्यांना खरी ओळख 973 मध्ये आलेल्या 'जंजीर' चित्रपटातील पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेमुळे मिळाली. त्यानंतर 'दीवार' आणि 'शोले' सारख्या चित्रपटांनी त्यांना एक उत्तम अभिनेता सिद्ध केलं. यानंतरचा इतिहास सगळ्यांचा माहिती आहे.