Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाक्षी सिन्हानं गुपचूप उरकला साखरपुडा? जाणून घ्या खरं की खोटं? समोर आलं ‘सीक्रेट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 16:36 IST

1 / 7
गेल्या अनेक दिवसांपासून सोना अर्थात सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. अलीकडे सोनाक्षीनं गुपचूप साखरपुडा उरकल्याची चर्चाही जोरात होती. अर्थात या चर्चेला कारण होतं.
2 / 7
सोनाक्षीनं सोशल मीडियावर तिची डायमंड रिंग फ्लॉन्ट करतानाचे काही फोटो शेअर केले होते. हे फोटो आणि तिच्या बोटातील रिंग पाहून सोनानं गुपचूप साखरपुडा केल्याचं मानलं गेलं होतं.
3 / 7
सोनीक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये सोनाक्षी कुणाचा तरी हात पकडून उभी असल्याचं दिसली होती. फोटोतील रिंग, मिस्ट्री मॅन सोबत कॅप्शनही तितकंच खास होतं.
4 / 7
माझ्या आयुष्यातील हा खास दिवस आहे. माझं सर्वात मोठं स्वप्नं पूर्ण होत आहे आणि हे मी तुमच्यासोबत शेअर करण्याची आणखी प्रतीक्षा करू शकत नाही. हे इतकं सोप्पं होतं, यावर माझा विश्वास बसत नाहीये..,असं तिनं लिहिलं होतं.
5 / 7
सोना साखरपुड्याबद्दल काहीही बोलली नव्हती. पण तरिही हे फोटो शेअर केल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. अगदी सेलिब्रिटींनीही तिला शुभेच्छा दिल्या होत्या. सोना खरंच एन्गेज्ड झाली का? हे कळायला मात्र मार्ग नव्हता.
6 / 7
पण आता खुलासा झालाये. होय, सोनाचा साखरपुडा वगैरे काहीही झालेला नाही. मुळात हे फोटो म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एका प्रमोशनचा भाग होता.
7 / 7
होय, सोना तिचा नवा आर्टिफिशिअल नेल ब्रँड लॉन्च करते आहे.SOEZI असं या ब्रँडचं नाव आहे. याच ब्युटिकेअर ब्रँडच्या प्रमोशनसाठी सोनानं हे फोटो शेअर केले होते.
टॅग्स :सोनाक्षी सिन्हाबॉलिवूड