Join us  

In Pics: वयाच्या मर्यादा विसरून या स्टार्सनी पडद्यावर केला रोमान्स, पाहाल तर थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 2:02 PM

1 / 9
‘अ सूटेबल बॉय’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. यात तब्बू व ईशान यांच्या किसींग सीन व लव्ह मेकिंग सीन्स आहेत. तब्बू ईशानपेक्षा 24 वर्षांनी मोठी आहे. या जोडीचा रोमान्स सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
2 / 9
2015 साली आलेल्या ‘डर्टी पॉलिटिक्स’ या सिनेमात मल्लिका शेरावत अभिनेते ओमपुरीसोबत आॅनस्क्रिन रोमान्स करताना दिसली होती. मल्लिकाने या सिनेमात ओमपुरीसोबत अनेक इंटिमेट सीन्स दिले होते. मल्लिका त्यावेळी ओमपुरींपेक्षा 23 वर्षांनी लहान होती.
3 / 9
‘चिनी कम’ या सिनेमात अमिताभ बच्चन व तब्बू यांचा रोमान्स दाखवण्यात आला होता. अमिताभ व तब्बू यांच्या वयात 29 वर्षांचे अंतर आहे. या जोडीचा आॅनस्क्रीन रोमान्स त्यावेळी चांगलाच गाजला होता.
4 / 9
2003 साली आलेला ‘मकबूल’ हा क्राईम थ्रीलर सिनेमात. या सिनेमात तब्बूने तिच्यापेक्षा 18 वर्षांनी मोठ्या पंकज कपूर यांच्यासोबत रोमॅन्टिक सीन दिले होते.
5 / 9
दे दे प्यार दे या अलीकडे रिलीज झालेल्या सिनेमात अभिनेत्री रकुल प्रीत सिंग तिच्यापेक्षा 22 वर्षांनी मोठ्या अजय देवगणसोबत रोमान्स करताना दिसली.
6 / 9
2011 साली आलेल्या ‘सात खून माफ’ या सिनेमात प्रियंका व अभिनेता इरफान खान यांचा रोमान्स पाहायला मिळाला होता. दोघांमध्ये 16 वर्षांचे अंतर होते.
7 / 9
1996 साली रिलीज ‘खिलाडियों का खिलाडी’ या सिनेमात रेखा व अक्षय कुमार यांच्यात रोमान्स दिसला होता. रेखा अक्षयपेक्षा 13 वर्षांनी मोठी आहे. या जोडीची तेव्हा चांगलीच चर्चा रंगली होती.
8 / 9
2007 साली प्रदर्शित ‘नि:शब्द’ या सिनेमात अभिनेत्री जिया खान तिच्यापेक्षा 40 वर्षांनी मोठ्या अमिताभ बच्चनसोबत आॅनस्क्रिन रोमान्स करताना दिसली होती.
9 / 9
दिल चाहता है या सिनेमात अभिनेत्री डिम्पल कपाडिया तिच्यापेक्षा 18 वर्षांनी लहान अक्षय खन्नासोबत आॅनस्क्रिन रोमान्स करताना दिसली होती.
टॅग्स :बॉलिवूडतब्बूइशान खट्टर