Join us  

घटस्फोटानंतर करिश्माने पोटगी म्हणून किती रक्कम घेतली माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 6:24 PM

1 / 10
90 च्या दशकात आपल्या आपल्या सौंदर्यानं लाखो तरुणांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री करिश्मा कपूर.
2 / 10
तिने अभिनयच्या जोरावर अनेकांची मने जिंकली होती. सर्वाधिक फी आकारणाऱ्या अभिनेत्रींपैकी ती एक होती.
3 / 10
करिश्माने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते.
4 / 10
अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले. सलमान खानपासून ते गोविंदा आणि इतर अनेक बड्या सुपरस्टार्ससोबत तिनं काम केलं.
5 / 10
आजही करिश्मा तिच्या चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवते. पण, प्रेमाच्या बाबतीत ती फारच दुर्दैवी ठरली.
6 / 10
अभिषेक आणि करिश्माचा साखरपुडा करण्यात आला होता. मात्र साखरपुड्यानंतर या दोघांचं लग्न मोडलं.
7 / 10
जया बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्यातील मतभेदांमुळे दोन्ही कुटुंबामधील संबंधांत कटुता निर्माण झाली.
8 / 10
त्यानंतर करिश्माने संजय कपूरशी लग्नगाठ बांधली.
9 / 10
करिष्मा आणि संजय कपूरला दोन मुलं आहेत. एक मुलगी समायरा आणि मुलगा कियान. पण करिश्मा आणि संजयचे नाते काही वर्षेच टिकले आणि दोघांचा 2016 मध्ये घटस्फोट झाला. घटस्फोटादरम्यान दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते.
10 / 10
रिपोर्टनुसार,संजय कपूरने करिष्माला पोटगी म्हणून १४ कोटी रुपये दिले होते. तसेच एक आलिशान घर दिलं. तो घटस्फोटानंतरही करिष्माला मुलांच्या संगोपनासाठी लाखो रुपये देतो.
टॅग्स :करिश्मा कपूरसेलिब्रिटीबॉलिवूडअभिषेक बच्चनलग्नघटस्फोट