Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयाने मोठ्या दिग्दर्शकासोबत लग्न केलं अन् फसली! घटस्फोटानंतर व्यसनाधीन झाली, सुपरस्टार अभिनेत्रीनं सोसलं बरंच काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 17:05 IST

1 / 8
चित्रपटांमध्ये चेहऱ्यावरील व्याकुळता, सोशिकता, शालीनता असे भाव दाखवून प्रेक्षकांच्या डोळ्यांत टचकन पाणी आणणाऱ्या ज्या हिंदी अभिनेत्रीचा नियमित उल्लेख केला जातो त्यापैकीच एक नाव म्हणजे ‘ट्रॅजिडी क्वीन’ मीनाकुमारी.
2 / 8
जन्मापासूनच नशीबाने साथ दिली नाही. असं म्हणतात त्या जन्माला आल्या तेव्हा आई-वडिलांच्या गाठी पैसेच नसल्याकारणाने त्यांना एका मुस्लीम अनाथाश्रमात सोडून यावं लागलं. नंतर त्यांना घरी आणलं गेलं. ज्या वयात मुले शाळेत जातात त्या वयात मीनाकुमारी यांनी इच्छा नसतानाही चित्रपट स्टूडीओच्या पायऱ्या चढू लागल्या.
3 / 8
वयाच्या ७ व्या वर्षापासून बेबी मीना चित्रपटांत बाल-कलाकार म्हणून काम करू लागल्या. त्यांचे वडील उर्दू कविता करायचे, हार्मोनियम वाजवायचे, चित्रपटांत क्षुल्लक भूमिकाही करायचे पण त्यांची निश्चित स्वरुपाची आवक नसल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्या लहानग्या खांद्यांवर येऊन पडली.
4 / 8
त्यावेळी निरागस, खट्याळ, प्रेमळ, त्यागी, रुपात विलक्षण गोडवा असलेली मीनाकुमारी पडद्यावर वेगवेगळ्या स्वरुपात अनुभवायला मिळाली.काही निखळ विनोदी भूमिकाही त्यांच्या वाट्याला आल्या पण पडद्यावर तिने साकारलेल्या'शोक'नायिकेलाच प्रेक्षकांनी उचलून धरलं.
5 / 8
मीनाकुमारी यांनी त्यांच्या अभिनय कारकि‍र्दीत चित्रलेखा, बहुबेगम, गझल, दिल आपण और प्रीत पराई, मी चूप रहूंगी, शारदा, काजल अशा अनेक चित्रपटांतून दर्जेदार अभिनयाने स्वत:चं वेगळं सिद्ध केलं.अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत.
6 / 8
१९५३ साली वयाने पंधरा वर्ष मोठे असलेल्या आणि विवाहित असलेल्या दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्यासोबत मीनाकुमारी यांनी लग्नगाठ बांधली. पण नंतर काही काळानंतर त्यांच्यात खटके उडू लागले. अवघ्या सात वर्षांनी म्हणजे १९६० साली त्यांची वैवाहिक कारकीर्द घटस्फोटापर्यंत पोहोचली.
7 / 8
१९६४ साली घटस्फोटावर कायदेशीर शिक्कामोर्तब झाले आणि मीनाकुमारी नैराश्याच्या गर्तेत सापडल्या.त्या व्यसानाधीन झाल्याचंही म्हटलं जातं. १९६४ च्या दरम्यान ती गंभीररित्या आजारी झाल्या. पिण्याचा तिच्या लिव्हरवर अतिशय वाईट परिणाम झाला होता.
8 / 8
त्यानंतर मीनाकुमारी यांना उपचारांसाठी लंडनला नेण्यात आले.त्यातून त्या बऱ्या झाल्या आणि चित्रपटांतून चरित्र अभिनेत्री साकारू लागल्या. ३१ मार्च १९७२ साली मीनाकुमारी यांनी जगाचा निरोप घेतला.पाकीजा हा त्यांच्या शेवटचा चित्रपट ठरला. त्या गेल्यानंतर हा चित्रपट बघायला प्रेक्षकांची अमाप गर्दी लोटली होती.
टॅग्स :मीना कुमारीबॉलिवूडसेलिब्रिटी