"महाराष्ट्राची मुलगी आणि पैठणीचं प्रेम", शिल्पा शेट्टीचा मराठमोळा अंदाज; फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 16:22 IST
1 / 7बॉलिवूडची देखणी आणि अतिशय फिट अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टीला ओळखलं जातं. ९० दशकात हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी ही अभिनेत्री या ना त्या कारणाने चर्चेत असते. वयाच्या पन्नाशीतही शिल्पा तिचं सौंदर्य आणि फिटनेस टिकवून आहे.2 / 7आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी शिल्पा आजही तितकीच लोकप्रिय आहे. ४८व्या वर्षीही शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसते.3 / 7शिल्पा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केलेत. या फोटोंनीं नेटकऱ्यांसह सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 4 / 7या फोटोंमध्ये शिल्पा शेट्टी सोनेरी आणि पिस्ता रंगाच्या पैठणी साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. शिल्पा शेट्टीने या फोटोंमध्ये मराठमोळा लूक केला आहे. 5 / 7अभिनेत्रीने नेक पीस,कानातले, अंगठी आणि ब्रेसलेटसह तिचा मोहक लूक पूर्ण केला आहे आणि किलर पोझ देत फोटोशूट केलं आहे.6 / 7सुंदर पेस्टल रंगाच्या पैठणीत शिल्पा शेट्टी शोभून दिसतेय. 'महाराष्ट्राची मुलगी आणि पैठणीचं प्रेम’ असं कॅप्शन तिनं या व्हायरल फोटोंना दिलंय. 7 / 7धडकन, मैं खिलाडी तू अनाडी, दस, रिश्ते, फिर मिलेंगे, परदेसी बाबू, ओम शांती ओम, दोस्ताना, लाईफ इ अ मेट्रो, जंग, कर्ज, रिश्ते, आग, छोटे सरकार यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये शिल्पाने उत्तम काम केलंय.