By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 18:01 IST
1 / 7 बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते-अभिनेत्री सापडतील, जे करिअरमधील पहिल्याच चित्रपटातून रातोरात स्टार झाले. मात्र, त्यानंतर मोजक्यांचा चित्रपटांमधून काम करत ते मोठ्या पडद्यावर काम करणं सोडून दिलं. यापैकीच एक नाव म्हणजे शमिता शेट्टी.2 / 7 अभिनेत्री शमिता शेट्टी ही लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण आहे. मोहबत्तें या चित्रपटातून शमिताने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. या चित्रपटासाठी तिला सर्वात्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार देखील मिळाला होता. या चित्रपटात तिने अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांसारख्या बड्या अभिनेत्यांबरोबर काम केलं. 3 / 7 पण, तरीही शिल्पा इतकं यश तिच्या वाट्याला आलं नाही. यानंतर शमिताने 'जहर', 'फरेब' आणि काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं, परंतु हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकले नाही. त्यामुळे अमृताने चित्रपटांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला होता. 4 / 7शमिताचा जन्म २ फेब्रुवारी १९७९ रोजी कर्नाटकातील बंगळुरू येथे झाला.तथापि, लहानपणापासूनच तिला ग्लॅमरपेक्षा क्रिएटिव्ह क्षेत्राकडे जास्त कल होता. फॅशन डिझायनिंगमधील तिच्या आवडीमुळे तिला प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्याकडे इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. 5 / 7 या काळात, मनीष मल्होत्राने शमिताला अभिनय क्षेत्रात नशीब अजमावण्याचा सल्ला दिला. पण, शमिता शेट्टीला टीव्हीने एक नवीन ओळख मिळाली. २००९ मध्ये ती 'बिग बॉस ३ मध्ये दिसली.6 / 7 यानंतर, २०२१ मध्ये, तिने 'बिग बॉस ओटीटी' मध्ये भाग घेतला, जिथे तिची पर्सनॅलिटी प्रेक्षकांना खूप आवडली आणि ती शोची उपविजेती ठरली. 7 / 7सध्या शमिता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.त्याद्वारे आपल्या दैनंदिन आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांसोबत शेअर करते. मिडिया रिपोर्टनुसार,शमिता शेट्टी जवळपास ४० कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.