SEE PICS : सोनाली कुलकर्णीचे हे फोटो तुम्हालाही पाडतील तिच्या प्रेमात...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 08:00 IST
1 / 8मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. आज तिचा वाढदिवस. 2 / 8मराठीतील गुणी अभिनेत्री अशी तिची ओळख. पण हिंदी, गुजराती, कन्नड, इटालियन, इंग्रजी सिनेमांतही तिने काम केलं आहे. सोनालीच्या अॅक्टिंग करिअरची सुरूवात झाली तीच मुळे ‘चेलुवी’ या गिरीश कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेल्या कन्नड चित्रपटाने.3 / 8‘दिल चाहता है’ या सिनेमातील भूमिकेने तिला बॉलिवूडमध्येही ओळख मिळवून दिली. यात ती सैफ अली खानच्या अपोझिट झळली होती. ‘प्यार तूने क्या किया’ या चित्रपटात फरदीनची हिरोईन होती तर ‘मिशन काश्मीर’ या सिनेमात संजय दत्तची पत्नी बनली होती.4 / 8पण हिंदी सिनेमात फार काही मनासारख्या भूमिका मिळत नाही, हे पाहून सोनालीने मराठी व गुजराती सिनेमांवर लक्ष्य केंद्रीत केलं. सोनालीच्या मते, भाषेने फरक पडत नाही तर भुमिका महत्त्वाची.5 / 8सोनालीने वयाची चाळीशी कधीच ओलांडली आहे. पण वय म्हणजे तिच्यासाठी नुसता आकडा म्हणता येईल. या वयातही सोनालीचं सौंदर्य तरूणींना लाजवणारं आहे.6 / 8सोनाली अतिशय फिट आहे. याचं कारण म्हणजे तिला सायकलिंगची आवड आहे. ती उत्तम सायकलिस्ट व रनर आहे, हे फार कमी लोकांना ठाऊक आहे.7 / 8मुंबईच्या रस्त्यावर भल्या पहाटे अनेकदा सोनाली सायकलिंग करताना दिसते. सायकलिंग करतानाचे फोटोही ती सोशल मीडियावर शेअर करत असते.8 / 8अभिनय कौशल्याने सोनालीने स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासोबत तिचं पहिलं लग्न झालं. पण हे नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि त्यानंतर नचिकेत पंतवैद्य यांच्यासोबत तिने दुसरा विवाह केला आहे. दोघांना कावेरी नावाची मुलगी आहे.