बाबो!! शरमन जोशीला वॉशरूममध्ये ऑफर झाला होता करिअरमधील सर्वात मोठा रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 17:18 IST
1 / 9थ्री इडियट्स फेम राजू अर्थात अभिनेता शर्मन जोशी याचा आज वाढदिवस. गुजराती रंगभूमीवरून करिअरची सुरुवात करणा-या शर्मनने ‘गॉडमदर’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण त्याला खरी ओळख दिली ती ‘स्टाईल’ या सिनेमाने. यानंतर रंग दे बसंती, थ्री इडियट्स या आमिर खानसोबतच्या सिनेमामुळे तो चर्चेत आला. यानंतर शर्मन ब-याच सुपरहिट सिनेमांत दिसला. त्याच्या कॉमेडीवर लोक फिदा आहेत. पण करिअरच्या सुरुवातीला चित्र थोडे वेगळे होते.2 / 9होय, शर्मनचा कॉमिक टायमिंग बराच खराब होता. खुद्द शर्मनने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. आधी माझा कॉमिक टायपिंग फार खराब होता. यावरून मला खूप टीकाही सहन करावी लागली. पण काम करत गेलो आणि सुधारणा होत गेली.3 / 9‘थ्री इडियट्स’ या सिनेमाबद्दल बोलाल तर या सिनेमाची ऑफर त्याला वॉशरूममध्ये मिळाली होती. शरमनने खुद्द लाइव्ह चॅटदरम्यान याचा खुलासा केला होता.4 / 9त्याने सांगितले होते की, माझी एक मीटिंग होती़ मध्ये थोडा वेळ होता, म्हणून मी सिनेमा पाहायला थिएटरमध्ये गेलो. थिएटरमध्ये मला राजकुमार हिरानी दिसले. पण ते बिझी दिसले. त्यामुळे त्यावेळी त्यांच्याशी बोलणे मला योग्य वाटले नाही.5 / 9पुढे त्याने सांगितले, मी तिकिट खिडकीवर गेलो. पण तिकिट न मिळाल्याने परत जाणार, तोच राजकुमार हिरानी यांनी मला माझ्या नावाने हाक मारली. हिरानींना माझे नाव माहित आहे, हे पाहून मला आनंद झाला, ते माझ्याजवळ आलेत आणि मला तुझे काम आवडते. एका सिनेमासाठी तुझा विचार करतोय, असे ते मला म्हणाले.6 / 9पुढे त्याने सांगितले की, यानंतर अनेक महिने त्यांचा ना मॅसेज आला, ना कॉल. तीन साडेतीन महिन्यानंतर आम्ही एका ऑडिटोरियमच्या वॉशरूममध्ये पुन्हा भेटलो आणि तिथे हिरानींनी मला थ्री इडियट्सची ऑफर दिली.7 / 9फार क्वचित लोकांना ठाऊक असेल की, ‘फेरारी की सवारी’ या सिनेमासाठी शर्मनने एकदा, दोनदा नाही तर तब्बल 40 वेळा ऑडिशन दिले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा होते. यांच्यासोबत शर्मनने थ्री इडियट्समध्येही काम केले होते. पण ‘फेरारी की सवारी’साठी शर्मनला बराच घाम गाळावा लागला. या चित्रपटातील लीड रोल मिळवण्यासाठी त्याने 40 वेळा ऑडिशन दिले होते.8 / 9शर्मन एका मराठी कुटुंबातील असून त्याचे वडील अरविंद जोशी गुजराती थिएटरचे दिग्गज कलाकार आहेत. शिवाय त्याच्या या कुटुंबातील इतर सदस्य सुध्दा थिएटरशी जुळलेले आहेत. शर्मनला स्वत:ला थिएटरमध्ये काम करण्याची आवड आहे. शर्मनची पत्नी ही एका प्रसिद्ध खलनायकाची मुलगी आहे. होय, शर्मनची पत्नी प्रेरणा ही प्रसिद्ध खलनायक प्रेम चोप्रा यांची मुलगी आहे.9 / 9शर्मन पत्नी प्रेरणा आणि प्रेम चोप्रा यांच्यासोबत अनेकवेळा सार्वजनिक कार्यक्रमात दिसतो. प्रेरणा आणि शर्मन यांची ओळख कॉलेजमध्ये झाली होती. काहीच दिवसांत ते एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स बनले आणि त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. खरं तर लग्नाच्या आधी कित्येक महिने ते दोघे नात्यात होते. पण त्या दोघांमध्ये कोणीच कोणाला प्रपोज केले नव्हते असे शर्मनने एका मुलाखतीत सांगितले होते. 15 जून 2000 ला त्या दोघांचे मुंबईत धुमधडाक्यात लग्न झाले. त्यांना एक मुलगी आणि दोन जुळी मुले आहेत.