Join us

"मला मुलं हवीत, नवरा नको", लग्न न करताच 'या' अभिनेत्रीला व्हायचंय आई, 'बिग बॉस' मुळे आलेली चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 15:46 IST

1 / 7
अभिनय क्षेत्रात टिकून राहायचं असेल तर संघर्ष कुणाला चुकलेला नाही. कलाविश्वात असे कलाकार आहेत ज्यांनी वर्षानुवर्ष मेहनत करुनही तितकी लोकप्रियता मिळाली नाही. तर काही असेही कलाकार आहेत, ज्यांना एका भूमिकेमुळे रातोरात स्टारडम मिळाला.
2 / 7
शिवाय, असेही आर्टिस्ट असतात जे कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अशीच एक अभिनेत्री जी आपल्या अभिनयामुळे नाहीतर विधानांमुळे कायम चर्चेत येत असते. अलिकडेच या अभिनेत्रीने लग्न न करता आई होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कोण आहे ती? जाणून घेऊया...
3 / 7
ही अभिनेत्री म्हणजे एडिन रोज आहे. 'बिग बॉस १८' च्या पर्वातून प्रसिद्धीझोतात आलेली एडिन रोज कायमच लाईमलाईट येते.
4 / 7
अलिकडेच ए़डिनने क्रिकेटर श्रेयस अय्यरसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यात आता अभिनेत्रीने आई बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिच्या या वक्तव्याने अनेकांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आहेत.
5 / 7
अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने खुलासा केला आहे. त्यादरम्यान ती म्हणाली, 'मला मुलं हवी आहेत पण नवरा नको. आज जो मुलगा चांगला आहे कोणाला माहित आहे उद्या तो माझ्यावर प्रेम करेलच. मी अशी अनेक प्रकरण पाहिली आहेत जिथे जोडप्याचं एकमेकावर खूप प्रेम असतं. मग त्यांनी लग्न केलं. ती स्त्री आई झाली आणि मुलामध्ये व्यस्त झाली. दरम्यान, तिचा नवरा तिला फसवत होता, मला त्या गोष्टी सहन होणार नाहीत. मी माझे एग्ज फ्रिज करणार आहे.' असं वक्तव्य अभिनेत्रीने केलं.
6 / 7
एडिन रोजने स्वतःला मुलांवर प्रेम करणारी व्यक्ती म्हटलं आहे. पण, तिला लग्न करायचे नाही. याशिवाय सांगताना ती म्हणाली, 'मी कोणाशी लग्न करावं? ज्याच्याशी मी लग्न करेन तो माणूस चांगला असेलंच असं नाही.' असं अभिनेत्रीने सांगितलं.
7 / 7
एडिन रोजचा जन्म २० ऑगस्ट १९९८ रोजी दुबई येथे झाला. तिची आई कर्नाटकची आहे आणि तिचे कुटुंबिय तामिळनाडूमध्ये वास्तव्यास आहेत. एडिनने वयाच्या २० व्या वर्षी ALT बालाजीच्या 'गंदी बात' या वेब सिरीजमध्ये काम केलं. त्यानंतर ती 'गुड गर्ल-ब्राइड नाईट' मध्येही दिसली.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी