Join us  

डेनिम शर्ट अन् साडी..., ‘बिग बॉस मराठी’ फेम सई लोकूरचं हटके फोटोशूट, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 1:42 PM

1 / 7
‘बिग बॉस मराठी’च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सई लोकूर ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रीय आहे. अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी तिची चर्चा कमी नाही.
2 / 7
अलीकडे सईने असे काही फोटो शेअर केले की, ते पाहून सगळ्यांनीच तिला दाद दिली. होय, तिच्या या हटके फोटोंवर अनेकांच्या नजरा खिळल्या.
3 / 7
निळ्या रंगाची डेनिम शर्ट अन् पांढऱ्या रंगाची साडी, पायात व्हाईट शूज अशा हटके अंदाजातील तिच्या या फोटोंनी अनेकांचं लक्ष वेधलं.
4 / 7
या फोटोंमध्ये सईने एकापेक्षा एक भारी पोझ दिल्या आहेत. तिचा हा अनोखा स्वॅग, हटके अदा बघण्यासारख्या आहेत.
5 / 7
अर्थात काहींना सईचा हा स्वॅग आवडला आहे तर काहींनी नेहमीप्रमाणे यावरून सईला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला आहे.
6 / 7
फॅशनच्या नावाखाली काहीही करतात, बकवास, भूत अशा कमेंट्स ट्रोलर्सनी केल्या आहेत. काहींना मात्र तिचा हा अंदाज आवडला आहे.
7 / 7
30 नोव्हेंबर 2020 रोजी सईने तीर्थदीप रॉयसोबत लग्नगाठ बांधली. तेव्हापासून सई तिच्या नवऱ्यासोबतचे काही फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
टॅग्स :सई लोकूरबिग बॉस मराठी