Join us

फॅट टू फिट! आत्ताची भारती सिंग पाहाल तर पाहातच राहाल, वर्षभरात घटवलं 15 किलो वजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 14:52 IST

1 / 8
टीव्हीची कॉमेडी क्वीन भारती सिंगला पाहाल तर पाहातच राहाल. होय, कधीकाळी लठ्ठपणामुळे लोकांचे टोमणे सहन करणारी भारती आता तिच्या गजब ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आहे.
2 / 8
भारतीचे वजन काही महिन्यांपूर्वी 91 किलो होते. ते आता घटून 76 किलो झाले आहे. भारतीचा हा फिट अवतार पाहून चाहतेही हैैराण आहेत. अगदी भारतीचा नवरा हर्ष हाही हैराण आहे.
3 / 8
भारतीचे मानाल तर, आपण इतकं वजन घटवलं, यावर तिलाही विश्वास बसत नाही. आता तिला डायबिटीज आणि अस्थमाही नियंत्रणात आला आहे. अर्थात 15 किलो वजन घटवण्यासाठी भारतीनं बरीच मेहनत घेतली.
4 / 8
तिनं सांगितलं, मी इंटरमिटेंट फास्टिंग करते. संध्याकाळी 7 वाजतापासून दुसºया दिवशी दुपारी 12 पर्यंत मी काहीही खात नाही. संध्याकाळी 7 नंतर माझं शरीर आता काहीही स्वीकारतं नाही.
5 / 8
मी 30-32 वर्ष खूप खाल्लं. आता गेल्या वर्षभर मी शरीराला आराम देण्याचा निर्णय घेतला आणि आता मला माझंच हलक वाटतंय. माझा नवराही खूश आहे, असं ती म्हणाली.
6 / 8
हर्षला माझा स्लिम अवतार आवडला आहे. पण बाहेर मी काहीही खाण्यास नकार देते, तेव्हा तो जरा चिडतो. माझे गोलमटोल गाल ओढायला मिळत नाही म्हणून तो अनेकदा नाराज होतो, असंही हसत हसत तिनं सांगितलं.
7 / 8
भारती सिंहला तिच्या वजनामुळे बरेच काही ऐकावे लागले होते. परंतु, तिने लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणि आपल्या कलेमुळे ती प्रत्येक घरात ओळखली जाऊ लागली. भारती ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय महिला कॉमेडियन आहे.
8 / 8
एका मुलाखतीत भारती सिंहने सांगितले होते की, माझ्या कुटुंबातील सदस्यांना कदाचित माझा जन्मच होऊ नये, असे वाटत होते. त्यावेळी ‘हम दो हमारा दो’ असा नारा होता. माझ्या अगोदर माझी भावंडं होती आणि मी आई-वडिलांची तिसरी अपत्य होते. माझी आई मला अजूनही सांगते की मला तुला जन्म द्यायचा नव्हता, कारण दोन मुलांची जबाबदारी खूप होती.
टॅग्स :भारती सिंग