कधी पाहिले नसतील भारती सिंहचे असे फोटो, चाहतेही झाले थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 17:36 IST
1 / 10छोट्या पडद्यावरची कॉमेडी क्वीन भारती सिंह सोशल मीडियावरही प्रचंड अॅक्टिव्ह आहे. तूर्तास भारती एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे.2 / 10होय, तर सध्या भारतीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून चाहतेही हैराण आहेत.3 / 10भारतीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात भारती कधी नव्हे ते बोल्ड पोज देताना दिसतेय.4 / 10आॅफ शोल्डर ड्रेसमध्ये भारती प्रचंड ग्लॅमरस दिसतेय. भारतीच्या चाहत्यांनी या फोटोंवर कमेट्स वर्षाव केला आहे.5 / 10हातात लाल चुडा, ओठांवर गडद लाल रंगाचे लिपस्टिक, साजेसे दागिणे असा तिचा लूक आहे.6 / 10भारती सिं छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडियन आहे. भारतीने तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे. भारतीचा पंजाब ते मुंबई हा प्रवास सोपा नव्हता. यासाठी तिला प्रचंड संघर्ष करावा लागला होता. 7 / 10भारती केवळ दोन वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट होती. अशास्थितीत भारतीने लहानपणापासूनच काम सुरु केले. 8 / 10रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेली भारती आज मोठ्या मेहनतीने कोट्यावधीची मालकीण बनली आहे.9 / 10 एका इंग्रजी वृत्तवाहिनीनुसार भारती एका शोमधून सुमारे 7-8 लाखांची कमाई करते. तिला अॅवॉर्ड शो आणि इतर वेगवेगळ्या कार्यक्रम होस्ट करण्याची भली मोठी रक्कम दिली जाते. 10 / 10विशेष म्हणजे भारती सिंह भारती सिंह टीवी कलाकारांमध्ये सर्वाधिक कमाई करणारी कलाकार आहे. टीव्ही कलाकारांमध्ये सर्वाधिक कमाई करणा-या 100 इंडियन एंटरटेनर्स फोर्ब्सच्या यादीत भारतीचे नाव आहे.