Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 16:39 IST
1 / 10'बालिका वधू' या लोकप्रिय टीव्ही मालिकेत 'गेहना'ची भूमिका साकारणारी नेहा मर्दा पुन्हा एकदा पडद्यावर कमबॅक करण्याची तयारी करत आहे.2 / 10लग्नानंतर आणि आई झाल्यानंतरही नेहाने काम करणं थांबवलं. तिला मातृत्वाचा काळ एन्जॉय करायचा होता.3 / 10जेव्हा नेहा गरोदर होती, तेव्हा तिने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं प्लॅनिंग केलं होतं. टाइम्स ऑफ इंडिया टीव्हीशी बोलताना नेहाने याबाबत खुलासा केला.4 / 10नेहा म्हणाली- 'मी कधीही विचार केला नव्हता की मी बिझनेसवुमन होईन. मी अजूनही १०-१२ तासांच्या नोकरीवर विश्वास ठेवते.'5 / 10'मी एक अभिनेत्री आहे आणि मला तेच आवडते. तुम्ही तुमच्या सहकलाकारांसोबत तासनतास काम करता.' 6 / 10'तुम्ही कलाकरांकडून शिकता. तुम्ही कामगिरी आणि सादरीकरणावर लक्ष केंद्रित करता.'7 / 10'मी ब्यूटी फिल्डमध्ये माझा व्यवसाय सुरू केला आहे. येत्या काही महिन्यात मी तुम्हासर्वांना एक गुडन्यूज देईन. मी काही गोष्टींबद्दल बोलेन.'8 / 10'तुम्ही मला पुन्हा दररोज टीव्हीवर पाहाल. मी बऱ्याच काळापासून कामाला खूप मिस करत आहे.' 9 / 10'आई होणं हे खूपच सुंदर आहे पण मी एक अभिनेत्री असल्याचा आनंदही घेत आहे' असंही नेहाने म्हटलं आहे. 10 / 10