Join us  

सध्या काय करतात आनंदीचे बापू खजान सिंह?; 'बालिका वधू' फेम अभिनेत्याने केलंय हॉलिवूडसाठीही काम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 10:10 AM

1 / 10
छोट्या पडद्यावर गाजलेली लोकप्रिय मालिका म्हणजे बालिका वधू. उत्तम कथानक आणि कलाकारांचा अभिनय यांच्या जोरावर ही मालिका तुफान गाजली.
2 / 10
आजदेखील छोट्या पडद्यावर या मालिकेचं रिपीट टेलिकास्ट केलं जातं. बालविवाहावर भाष्य करणारी ही मालिका त्याकाळी तुफान लोकप्रिय झाली होती.
3 / 10
आनंदी, जगदीश, कल्याणी देवी, भैरो सिंह, भगवती अशी मालिकेतील कितीतरी पात्र आज लोकप्रिय झाले. ही मालिका संपून बराच वेळ झाला आहे. त्यामुळे या मालिकेतील कलाकार नेमके काय करता असा प्रश्न चाहत्यांना पडतो.
4 / 10
सध्या सोशल मीडियावर या मालिकेतील खजान सिंह याची चर्चा रंगली आहे. या मालिकेत खजान सिंह हे आनंदीचे वडील दाखवले आहेत.
5 / 10
बालिका वधूमध्ये अभिनेता चैतन्य आदीब याने खजानसिंह ही भूमिका साकारली होती. सध्या ते काय करतात, कसे दिसतात ते जाणून घेऊयात.
6 / 10
चैतन्य आदीब अभिनेता असण्यासोबतच एक व्हॉइस ओव्हर आर्टिस्टदेखील आहेत. त्यांनी हॉलिवूडमध्येही काम केलं आहे.
7 / 10
चैतन्य हे मूळचे राजस्थानधील उदयपूर येथील आहेत. परंतु, नशीब आजमावण्यासाठी ते मुंबईत आले. इथे आल्यावर १९७३ मध्ये त्यांनी इंग्लिश टीव्ही सीरिज ‘द यंग अँड द रेस्टलेस’साठी आपला आवाज दिला.
8 / 10
त्यानंतर त्यांनी दाक्षिणात्य चित्रपट ‘मिर्ची’ या चित्रपटामध्ये प्रभाससाठी आवाज दिला. आतापर्यंत चैतन्य यांनी प्रभाससह व्यंकटेश,प्रभूदेवा,कार्तिक व विजय यांना आपला आवाज दिला आहे.
9 / 10
चैतन्य यांनी हॉलिवूडमधील ‘बॅटमॅन’, ‘लुसिफर’ व ‘ड्रॅक्युला’ या चित्रपटांमधील मुख्य भूमिकांना आपला आवाज दिला आहे.
10 / 10
चैतन्य सोशल मीडियावर सक्रीय आहेत. तसंच ते कलाविश्वातही चांगलेच सक्रीय आहेत. रामगोपाल वर्मांच्या ‘रक्त चरित्र’, ‘मुंबई सेंट्रल’ या चित्रपटात ते झळकले होते. त्यानंतर अलिकडेच ते ‘तुलसीधाम के लड्डू गोपाल’मध्ये सुद्धा झळकले होते.
टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजनसिनेमाहॉलिवूडTollywood