Join us
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा रेस्टॉरंटमध्ये मुलाला विसरते तेव्हा...! स्वत: सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 18:14 IST

1 / 7
आयुष्यमान खुराणा त्याच्या शानदार अभिनयासाठी ओळखला जातो. पण त्याची बायको ताहिरा कश्यप ही काही कमी नाही. ताहिरा लेखिका आहे, निर्माती आहे, दिग्दर्शिका आहे शिवाय दोन मुलांची आई सुद्धा आहे.
2 / 7
तशी ताहिरा एक कर्तव्यदक्ष आई आहे. पण एकदा ती चक्क मुलाला रेस्टॉरंटमध्ये विसरली होती. होय, खुद्द ताहिराने तिच्या ‘द 7 सिन्स ऑफ बीइंग अ मदर’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी हा खुलासा केला.
3 / 7
हिंदुस्तान टाइम्सला नुकतीच ताहिराने एक मुलाखत दिली. यावेळी विराजवीरच्या जन्मानंतरची ही घटना तिने सांगितली.
4 / 7
मी माझा मुलगा विराजवीरला एका रेस्टॉरंटमध्ये विसरले होते. एक वेटर धावत आला आणि म्हणाला मॅडम तुम्ही तुमच्या मुलाला विसरलात, असं मला म्हणाला. सगळे लोक माझ्याकडे बघत होते आणि मी लाजीरवाणी झाले होते. त्यावेळी विराजवीर हा काही महिन्यांचा होता, असे ती म्हणाली.
5 / 7
ताहिराने तिच्या पुस्तकात हा किस्सा सविस्तर सांगितला आहे. दुपारी मी माझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींसोबत लन्चला गेले होते. मी बॅग घेतली, बिल दिलं. पण माझ्या मुलाला घ्यायला विसरले होते. सर्वजण लिफ्टच्या दिशेने निघालो. तेवढ्यात एक वेटर माझ्यादिशेने धावत आला आणि मॅडम, तुम्ही तुमच्या मुलाला विसरलात, असं म्हणाला. सगळे माझ्याकडे अवाक् होऊन बघत होते, असे तिने लिहिले आहे.
6 / 7
अभिनेता आयुष्यमान खुराणा याची पत्नी ताहिरा कश्यप एक प्रोफेसर आहे. शिवाय ‘टॉफी बिफोर’ नामक शॉर्ट फिल्म तिने दिग्दर्शित केली आहे.
7 / 7
आयुष्यमान ‘अंदाधुन’ या चित्रपटात बिझी असताना ताहिराला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले होते. आयुष्यमानने २०११ मध्ये ताहिरा कश्यपसोबत लग्न केले. त्याआधी 11 वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होत़े. ताहिरा 16 वर्षांची होती, तेव्हा दोघांची भेट झाली होती.
टॅग्स :ताहिरा कश्यपआयुषमान खुराणा