IN PICS: फक्त भाग्यश्रीची लेक आहे म्हणून..., अवंतिका दसानीला बॉलिवूडमध्ये काम मिळेना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 11:35 IST
1 / 10‘मैंने प्यार किया’ या एकाच चित्रपटाने स्टार झालेली अभिनेत्री भाग्यश्री हिची लेक अवंतिका दसानी पुन्हा एकदा हेडलाइन्समध्ये आहे.2 / 10‘मिथ्या’मधून भाग्यश्रीच्या लेकीचा शानदार डेब्यू झाला. पण हा स्ट्रगल इतकाही सोपा नाही. स्टार किड म्हणून तुम्हाला कोणीही काम देत नाही. एका मुलाखतीत अवंतिका यावर बोलली.3 / 10खरं तर अवंतिकाला अभिनेत्री व्हायचं नव्हतं. यामागे एकच कारण होतं, ते म्हणजे नेपोटिज्म. म्हणजे बॉलिवूडची घराणेशाही. पण नंतर तिने अॅक्टिंगमध्ये यायचा निर्णय घेतला.4 / 10याबद्दल ती म्हणाली, नेपोटिज्ममुळे मला अॅक्टिंगमध्ये यायचं नव्हतं. म्हणून मी बिझनेस व मार्केटींगमध्ये डिग्री घेतली. मी कार्पोरेट जॉबही केला. पण नियतीला वेगळंच काही मंजूर होतं.5 / 10मी खूप अभ्यास केला. कॉलेजात टॉप केलं. यानंतर शिकण्यासाठी लंडनला गेले. मी चांगलं काम करत होते. पण आनंदी नव्हते..., असं तिने सांगितलं.6 / 10पुढे ती म्हणाली, एकदिवस माझ्या भावाने मला अॅक्टिंगमध्ये काम करण्याचा सल्ला दिला. मी एका प्रोजेक्टमध्ये काम केलं आणि मला अॅक्टिंगचं वेड लागलं.7 / 10फिल्मी कुटुंब, स्टार किड, नेपोटिज्म या वादात पडायला मला आवडत नाही. आधी मी यामुळे दु:खी व्हायचे. पण आता मी आनंदी आहे, असंही तिने सांगितलं.8 / 10अॅक्टिंगमध्ये खूप मोठा स्ट्रगल करावा लागणार, हे मला आधीच ठाऊक होतं. कारण मी भावाचा स्ट्रगल बघितला होता. भाग्यश्रीची मुलगी म्हणून तुम्हाला कोणी काम देत नाही. काम फक्त प्रतिभेच्या जोरावर मिळतं, असं ती म्हणाली.9 / 10आईने मला व माझ्या भावाला स्ट्रगलसाठी चांगलं तयार केलं आहे. तुमच्यात प्रतीभा असेल तर काम मिळतंच, हे तिने आम्हाला शिकवलं, असं ती म्हणाली.10 / 10वर्कफ्रंटबद्दल म्हणाल तर लवकरच अवंतिका नेनु स्टुडंट या तामिळ सिनेमात दिसणार आहे. आईसोबत अनेक इव्हेंटमध्ये अवंतिका दिसते.