Join us

'अष्टविनायक'मधली सचिनजींची बायको आठवते? प्रसिद्धीनंतर सोडली इंडस्ट्री, गुजराती व्यक्तीशी लग्न केलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 16:45 IST

1 / 9
'अष्टविनायका तुझा महिमा कसा...', 'प्रथम तुला वंदितो' ही मन प्रसन्न करणारी गाणी आजही लोकप्रिय आहे. 'अष्टविनायक' सिनेमाप्रमाणेच ही गाणंही प्रचंड हिट झाली.
2 / 9
१९७९ साली प्रदर्शित झालेल्या 'अष्टविनायक' सिनेमातून गणरायाच्या भक्तीची आणि त्याच्या भक्ताची कथा दाखवण्यात आली होती.
3 / 9
या सिनेमात सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री वंदना पंडित यांनी मुख्य भूमिका साकारली होती.
4 / 9
'अष्टविनायक'मध्ये सचिनजींच्या पत्नी वीना भोसले या भूमिकेत त्या दिसल्या होत्या. त्यांचा लोभस चेहरा आणि सालस अभिनय याने सगळ्यांनाच भुरळ पाडली होती.
5 / 9
या सिनेमामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. पण, यशाच्या शिखरावर असतानाच वंदना यांनी इंडस्ट्री सोडली. आणि गुजराती असलेल्या संजीव सेठ यांच्यासोबत संसार थाटला.
6 / 9
'अष्टविनायक' सिनेमात काम केलं तेव्हा त्या केवळ १७-१८ वर्षांच्या होत्या. या सिनेमानंतर त्यांच्याकडे मराठी आणि हिंदी सिनेमांची रांग लागली होती.
7 / 9
वंदना यांनी बालपणापासूनच अभिनय करायला सुरुवात केली होती. गोकुळचा चोर या नाटकातून त्या अभिनय क्षेत्रात आल्या. नंतर दूरदर्शनच्या काही मालिकांमध्येही त्या दिसल्या होत्या.
8 / 9
मात्र लग्नानंतर त्यांनी घरी लक्ष देण्याचं ठरवलं. त्यानंतर काही वर्षांनी त्यांच्या पतीचं निधन झालं. त्यामुळे त्या खचल्या होत्या.
9 / 9
मात्र लेकींच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी ४० वर्षांनी पुन्हा अभिनय करायचं ठरवलं. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत त्या दिसल्या होत्या.
टॅग्स :अष्टविनायक गणपतीसचिन पिळगांवकरसेलिब्रिटी