आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुनं चाहत्यांना दिला हा जगण्याचा खास मंत्र, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 06:00 IST
1 / 9रिंकू राजगुरूने फोटो शेअर करून चाहत्यांना जगा, हसा आणि प्रेम करा हा कानमंत्र दिला आहे.2 / 9रिंकू राजगुरू सोशल मीडियावर सक्रीय असून फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. 3 / 9रिंकू राजगुरूच्या सोशल मीडियावरील फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळत असते. 4 / 9कधी साडीतील फोटो तर कधी वेस्टर्न आऊटफिटमधील फोटोतून रिंकू चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. 5 / 9बऱ्याचदा तिचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.6 / 9रिंकू राजगुरू सध्या दिग्दर्शक सार्थक दासगुप्ता यांच्या प्रोजेक्टमध्ये काम करते आहे. सार्थक दासगुप्ता त्यांच्या सोशल मीडिया इंस्टाग्रामवर त्यांच्या शूटिंगचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.या प्रोजेक्टमध्ये तिच्यासोबत अमोल पालेकर दिसणार आहेत.7 / 9रिंकू राजगुरूने काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.8 / 9रिंकू झुंड हिंदी चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.9 / 9रिंकू राजगुरूचे इंस्टाग्रामवर ३ लाख ४० हजार फॉलोव्हर्स आहेत.