गायी-म्हशीचं नाही तर हे स्पेशल दूध पिते अनुष्का शर्मा, साखरही केलीय वर्ज्य, जाणून घ्या अभिनेत्रीचा डाएट प्लान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 12:55 IST
1 / 8अनुष्का शर्माने सध्या बॉलिवूडपासून दूर आहे, पण कोणत्या ना कोणत्या कारणाने ती चर्चेत असते. अनुष्का तिच्या फॅशन स्टेटमेंट आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. अभिनेत्री स्ट्रिक्ट डाएट करते. ती साखर अजिबात खात नाही.2 / 8याशिवाय अनुष्का गाई-म्हशीचे दूधही पीत नाही. ती घरी बनवलेले बदामाचे दूध पिते. याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने केला होता.3 / 8अभिनेत्रीने एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, ती नेहमी काही गोष्टी टाळते. अनुष्का म्हणाली होती की, मी साखर खात नाही. मी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खात नाही. मी राजगिरा, बाजरी, ज्वारी आणि क्विनोआपासून बनवलेली भाकरी खाते.4 / 8याशिवाय अनुष्का शर्मा हिने सांगितले होते की, ती बाजारात मिळणारे दूध पीत नाही. तिला त्या दुधाची चव आवडत नाही. तिने घरगुती बदामाच्या दुधाची रेसिपीही शेअर केली होती.5 / 8अनुष्का तिच्या नाश्त्यात प्रोटीनयुक्त आहार घेते. एकदा तिने हेल्दी दही आणि मुसळीचा फोटोही शेअर केला होता. तिला नाश्त्यात इडली सांबार खायलाही आवडते.6 / 8११-१२ वाजण्याच्या सुमारास अनुष्का तिचं लंच करते. ती दुपारच्या जेवणात डाळ, चपाती आणि भाजी खाते. अनुष्काला घरचे जेवण आवडते. अनुष्काला बटाट्याची भाजी खूप आवडते.7 / 8तिची तब्येत लक्षात घेऊन अनुष्का रात्रीचे जेवणही लवकर करते. तिने सांगितले होते की, तिची मुलगी वामिका लवकर रात्रीचे जेवण करते कारण ती लवकर झोपते, म्हणूनच ती ५.३० पर्यंत रात्रीचे जेवण करते.8 / 8वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, अनुष्का शेवटची झिरो चित्रपटात दिसली होती. याशिवाय कला सिनेमातही तिने विशेष भूमिका केली होती.