Join us  

अनु मलिकची लेकी करतीये दिग्गज अभिनेत्रींवर मात; 'या' क्षेत्रात आहे कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 5:47 PM

1 / 10
उत्तम गायक, संगीतकार, संगीत दिग्दर्शक अनु मलिक याने बॉलिवूडमध्ये त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
2 / 10
आपल्या गाण्यांमुळे चर्चेत येणारा अनु मलिक यावेळी त्याच्या लेकींमुळे चर्चेत येत आहे.
3 / 10
अनु मलिकला दोन लेकी असून त्यादेखील कलाविश्वात सक्रीय आहे.
4 / 10
अनमोल आणि अदा अशी अनु मलिकच्या लेकींची नावं असून बऱ्याचदा अनु त्यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.
5 / 10
अनु मलिकने अंजली वसुदेव भट्ट यांच्याशी लग्न केलं आहे.
6 / 10
अनु मलिक यांची मोठी लेक अनमोल २८ वर्षांची आहे. तिने इंग्लंडमधून तिचं बीएससी कॉम्प्युटर सायन्स आणि बिझनेसचं शिक्षण घेतलं आहे.
7 / 10
तर अनु मलिकची दुसरी लेक अदा हिने न्यूयॉर्कमधून फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे.
8 / 10
अनमोलला संगीताची विशेष आवड असून सध्या ती बॉलिवूडमध्ये म्युझिक इंडस्ट्रीमध्येच काम करत आहे.
9 / 10
अनमोलने मर्दानी ते दम लगा के हईशा या सिनेमासाठीही काम केलं आहे.
10 / 10
दुसरीकडे अदा उत्तम फॅशन डिझायनर असून तिने अनेक रॅम्प शो केले आहेत.
टॅग्स :अनु मलिकसेलिब्रिटीबॉलिवूड