By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 15:56 IST
1 / 10टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच तिचा बॉयफ्रेन्ड विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकणार आहे आणि प्री-वेडिंग सेरेमनी सुरू झालीये.2 / 10लग्नाच्या आधी काल रात्री रंगली तर अंकिताची बॅचलर पार्टी. या पार्टीचे फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.3 / 10मुंबईच्या एका रेस्टॉरंटमध्ये सना मकबूल, अपर्णा दीक्षिता, मृणाल ठाकूर, रश्मी देसाई, अमृता खानविलकर, अभिज्ञा भावे अशा सगळ्याजणी अंकिताच्या बॅचलर पार्टीत सामील झाल्या आणि मग धम्माल मस्ती रंगली.4 / 10‘ब्राईड टू बी’अंकिता मरून कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये पार्टीसाठी आली. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.5 / 10हॉटेलबाहेर फोटोग्राफर्सला अंकिताने एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्यात. यावेळी ती प्रचंड ग्लॅमरस दिसत होती.6 / 10पार्टीत अंकिताने ट्रेंडी केक कापला. मग धम्माल डान्स झाला. एकंदर अंकिताने पार्टीचा मनमुराद आनंद घेतला.7 / 10रिपोर्टनुसार, अंकिता 12 डिसेंबरला विकीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. तीन दिवस हा लग्नसोहळा चालणार आहे. 8 / 10अंकिताच्या लग्नात अनेक सेलिब्रिटी परफॉर्म करणार असल्याचीही खबर आहे. यातले एक नाव रॅपर बादशहाचेही आहे.9 / 10अंकिता व विकी जैन दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत.10 / 10विकी जैन आधी ती बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती.