Join us

पवित्र रिश्ता...! पाहा, अंकिता लोखंडे व विकी जैनच्या लग्नाचे 10 Candid Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 10:41 IST

1 / 10
अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा बॉयफ्रेन्ड विकी जैन अखेर लग्नबंधनात अडकले. काल 14 डिसेंबरला अगदी शाही थाटात हा लग्नसोहळा पार पडला. तूर्तास या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (सर्व फोटो @lokhandeankita )
2 / 10
सप्तपदीनंतर दोघांनीही हातात हात घेत एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं तो क्षण...लग्नानंतर विकीने अंकिताचा हात हातात घेतला आणि अंकिता हळूच लाजली. हा क्षणही कॅमे-यात कैद झाला.
3 / 10
अग्नीच्या साक्षीने अंकिता व विकी एकमेकांचे झालेत. हा आनंद लपता लपत नव्हता. अंकिताच्या चेह-यावरचा आनंद तर बघण्यासारखा होता.
4 / 10
नववधूच्या साजशृंगारात अंकिता लग्नमंडपात आली तो क्षण. यावेळी अंकिता चेह-यावरचा ग्लो तुम्ही पाहू शकता.
5 / 10
लग्नमंडपात अंकिताची अशी ग्रॅण्ड एन्ट्री झाली. विकीच्या तर नजरा तिच्यावरून हटेनात...
6 / 10
घंटानाद आणि शंखनाद सुरू होता आणि अंकिता व विकी यांनी एकमेकांना वरमाला घातली.
7 / 10
सप्तपदीदरम्यान विकी पूर्णवेळ अंकिताला सांभाळताना दिसला. यावेळी नवरानवरीवर फुलांची बरसात करण्यात आली.
8 / 10
लग्नानंतर नवदांम्पत्याने सर्व मोठ्यांचा आणि देवाचा आशीर्वाद घेतला. दोघांनीही हात जोडून उपस्थितांना अभिवादन केलं.
9 / 10
लग्नानंतर अंकिता अशी विकीच्या डोळ्यांत हरवली. हा क्षण कॅमे-यानं अलगद टिपला.
10 / 10
लग्नसोहळ्यातील हा कॅन्डीड फोटो तुम्ही पाहू शकता. सध्या अंकिताच्या लग्नाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
टॅग्स :अंकिता लोखंडे