पवित्र रिश्ता!! अंकिता लोखंडेची लगीनघाई, पाहा, प्री-वेडिंग सेरेमनीचे खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 14:10 IST
1 / 9कतरिना कैफ व विकी कौशल या जोडप्यासोबतच आणखी एक जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे. होय, अभिनेत्री अंकिता लोखंडे येत्या 14 डिसेंबरला विकी जैनसोबत लग्नगाठ बांधणार आहे. तर या लग्नाच्या विधी सुरू झाल्या आहेत.2 / 9अलीकडे अंकिता व विकी एकता कपूरकडे लग्नाची निमंत्रण पत्रिका घेऊन गेले होते. आता दोघांची प्री-वेडिंग सेरेमनी सुरू झाली आहे.3 / 9 अंकिता आणि विकी यांनीसुद्धा इन्स्टाग्रामवर काही खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये दोघंही पारंपरिक लूकमध्ये पहायला मिळत आहेत. 4 / 9‘पवित्र’ असं कॅप्शन देत अंकिताने लग्नविधीचा फोटो शेअर केला आहे. सोबत हार्ट इमोजीही पोस्ट केल्या आहेत.5 / 9फोटोंमध्ये अंकिता पोपटी रंगाच्या साडीत आहे. तर विकीनं पांढ-या रंगाचा कुर्ता-पायजामा घातला आहे. अंकिताच्या हातात हिरवा चुडा आहे तर दोघांनीही मुंडावळ्या बांधल आहेत.6 / 9हे फोटो एका धार्मिक विधीचे आहेत. सर्व फोटो दृष्ट लागावी इतके सुंदर आहेत. दोघंही नेहमीप्रमाणे आनंदात आहेत. 7 / 9काही दिवसांपूर्वीच अंकिताने गर्ल गँगसोबत बॅचलर पार्टी एन्जॉय केली होती. या पार्टीतही अंकिता धम्माल मस्ती करताना दिसली होती.8 / 9अंकिताच्या 34 व्या बर्थ डे पार्टीत विकी जैन पहिल्यांदा दिसला होता. यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.9 / 92019 मध्ये विकीनं अंकिताला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. विकीआधी अंकिता दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण कालांतराने त्यांच ब्रेकअप झालं होतं.