हृदयाचे ठोके थांबतात तेव्हा...! अंकिता लोखंडेची ही पोस्ट नेमकी कोणासाठी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 17:09 IST
1 / 9‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे गेल्या अनेक दिवसांपासून ट्रोल होतेय. एक्स-बॉयफ्रेन्ड सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अंकिता त्याच्या नावावर लोकप्रियता मिळवू पाहतेय, असा आरोपही तिच्यावर झाला. आता कदाचित अंकिताने या ट्रोलर्सला उत्तर दिले आहे.2 / 9आत्तापर्यंत ट्रोलर्सने अंकिताला नको ते ऐकवले. यावर तिने कधीही कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. पण आता तिने एका पोस्टमधून ट्रोलर्सला अप्रत्यक्षपणे टोमणा मारला आहे.3 / 9हृदयाचे ठोके थांबतात, तेव्हा लोक तुमच्यावर प्रेम करायला लागतात, अशा आशयाची एक इन्स्टास्टोरी अंकिताने शेअर केली.4 / 9अंकिताने शेअर केलेली ही पोस्ट आणि त्यातील शब्द कदाचित सुशांतचे चाहतेही नाकारू शकणार नाहीत.5 / 9सुशांतच्या निधनानंतर नेमकी हीच भावना होती. तो जिवंत असताना त्याच्यातील प्रतिभा कोणीच ओळखली नाही, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली होती.6 / 9अंकिताने तिच्या पोस्टमधून नेमकी हीच गोष्ट अधोरेखित केली आहे. ही पोस्ट शेअर करण्यामागचा तिचा नेमका हेतू मात्र तिलाच ठाऊक़7 / 9अंकिता लोखंडे विकी जैनसह असलेल्या रिलेशनशिपमुळे सध्या चर्चेत आहे. लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.8 / 9अंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते.9 / 9अंकिता आणि सुशांतची भेट 2009 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेवेळी झाली होती. त्यानंतर दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. पुढे 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले.