बॉयफ्रेंड विक्की जैनसह शेअर केला अंकिताने फोटो, पुन्हा झाली ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 12:15 IST
1 / 10 अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी एकता कपूरची मालिका पवित्र रिश्तामध्ये सोबत काम केलं होतं आणि यादरम्यान दोघांची मैत्री प्रेमात बदलली. ही मालिका सुपरहिट ठरली होती. 2 / 10 त्यानंतर अंकिता-सुशांत बराच वेळ सोबत घालवू लागले.सुशांतने अंकिताला पुढील सात जन्माची साथ मागितली होती. ज्यानंतर ज्युरीमध्ये बसलेल्या प्रियांका चोप्राने त्याला विचारले होते की, काय तू नॅशनल टीव्हीवर अंकिताला विचारले की, तू माझ्यासाठी लग्न करशील का? सुशांत यावर हो म्हणाला तर प्रियांकानेही अंकिताला यावर उत्तर मागितलं. 3 / 10 यावर अंकितानेही सुशांतला लग्नासाठी होकार दिला होता.अंकिताने एका मुलाखतीत सांगितले होते की, सुशांत आधीसारखा राहिला नव्हता. 4 / 10 आता तो आधी ज्या लोकांसोबत राहत होता त्यांच्या टचमध्ये राहत नव्हता. त्याच्या वागण्यात बदल झाला होता आणि तो आधीसारखा फोन कॉलही करत नव्हता. दोघांच्या करिअरचे ट्रॅक वेगळे झाले होते आणि दोघांमध्ये कामामुळे अंतर वाढलं होतं. याच कारणाने दोघांचं ब्रेकअप झालं.5 / 10 सुशांत नंतर अंकिता पुन्हा एकदा प्रेमात पडली. अपने ब्वॉयफ्रेंड विक्की जैनसह दोघांचे रोमँटीक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सुशांतच्या निधनानंतर अंकिता विक्कीसोबत आता लग्न करणार आहेत. 6 / 10 सुशांतच्या चाहत्यांना अंकिताचे विकीसह असलेले नाते रुचत नाही. नेहमीच सोशल मीडियावर तिला ट्रोल केले जाते.नुकताच तिने विकी जैनसह क्वॉलिटी टाईम स्पेंड करत असल्याचे फोटो शेअर केला. 7 / 10 फोटो विकी जैनच्या पाठीवर बसलेली ती पाहायला मिळत आहे. गोवामध्ये दोघेही गेल्यावर्षी व्हॅकेशनसाठी गेले होते. त्यावेळचा हा फोटो आहे. फोटो पाहून चाहत्यांनी नाराजी व्यक्त करत अंकिताला खडेबोल सुनावत असल्याचे पाहायला मिळत आहे.8 / 10अंकिताचे विक्की जैनसह अशा प्रकारे एन्जॉय करत असल्याचे पाहून सुशांतला विसरल्याचे तिला सुनावत असल्याचे पाहायला मिळत आहे.सुशांतच्या मृत्यूला काही महिनेच झाले असताना अंकिताने इतक्या धूमधडाक्यात बर्थ डे साजरा केला, हेही अनेकांना खटकले होते. 9 / 10 यावरूनही अंकिताला ट्रोल केले गेले. सुशांतसाठी तरी यावर्षी बर्थ डे साजरा करायचा नसता, असे म्हणत अनेकांनी तिच्यावर टीका केली होती.10 / 10 काहींनी अंकिताची बाजू घेत, तिला सपोर्टही केला. सुशांत हा अंकिताचा भूतकाळ होता. तिलाही आनंदी राहण्याचा अधिकार आहे,असे म्हणत अनेकांनी तिची बाजू मांडली.