Join us

IN PICS : अंकिता लोखंडेचा पती विकी जैन बिझनेसमॅन आहे, पण नेमका कशाचा करतो बिझनेस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 16:34 IST

1 / 11
अभिनेत्री अंकिता लोखंडेने नुकतीच विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली. गेल्या 14 डिसेंबरला हे लग्न पार पडलं. पण अद्यापही मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस जैनच्या लग्नाच्या चर्चा थांबण्याचं नाव नाही.
2 / 11
मुंबईतील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये अंकिता व विकीचा शाही विवाहसोहळा पार पडला आणि या लग्नसोहळ्याचा थाट पाहून प्रत्येकजण अवाक् झाला. प्रत्येक सोहळा इतका शाही होता की तो पाहून अनेकांचे डोळे दिपले.
3 / 11
लग्नानंतर मिस्टर व मिसेस जैन लवकरच नव्या 8 बीएचके अलिशान घरात शिफ्ट होणार आहेत. पण अंकिताचा पती विकी जैन नेमका कोण? हा प्रश्न अद्यापही चाहत्यांच्या मनात आहे. तो कोण, कुठला, करतो काय? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. तर आज आम्ही त्याच्याचबद्दल सांगणार आहोत.
4 / 11
तर विकी हा मोठा बिझनेस मॅन आहे. अगदी प्रत्येक सेक्टरमध्ये त्याचा बिझनेस आहे. विकी हा मुळचा छत्तीसगडचा आहे. अर्थशास्त्र विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर विकीने एमबीए केलं आणि यानंतर वडिलोपार्जित व्यवसायात त्याने स्वत:ला झोकून दिलं.
5 / 11
विकी एका कोळसा व्यापा-याचा मुलगा आहे. त्याचे आई-वडील विनोद कुमार जैन आणि रंजना जैन दोघेही व्यवसाय करतात. लाकडी कोळसा, पीआयटी कोळसा आणि बिटुमिनस कोळसा असा त्यांचा व्यवसाय आहे.
6 / 11
सध्या विकी हा बिलासपूरमधील महावीर इन्स्पायर ग्रुपचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. त्याची ही कंपनी कोल ट्रेडिंग, वॉशरी, लॉजेस्टिक, पॉवरप्लान्ट, रिअल इस्टेट व डायमंडचा व्यवसाय करते.
7 / 11
रिपोर्टनुसार, बिलासपूरमध्ये जैन कुटुंबीयांचा फर्निचरचं शोरूमपासून डेंटल इन्स्टिट्यूटपर्यंत अनेक क्षेत्रात मोठा दबदबा आहे.
8 / 11
शिक्षण क्षेत्रातही जैन कुटुंबानं मोठा पैसा लावला आहे. विकीचे वडील डेंटल इन्स्टिट्यूटच्या संस्थापकांपैकीएक आहेत. शिवाय एका प्री-स्कूलमध्येही त्यांची गुंतवणूक असल्याचं कळतं.
9 / 11
नवीन पिढीतील विकी आता क्रीडा क्षेत्रातही उतरला आहे. तो बॉक्स क्रिकेट लीग संघ, मुंबई टायगर्सचा सहमालक आहे. ग्लॅमर इंडस्ट्रीपासून सध्या तो दूर आहे. पण येत्या काळात या इंडस्ट्रीतही त्यानं पैसा ओतला तर आश्चर्य वाटायला नको.
10 / 11
कोट्यवधी रूपयांच्या संपत्तीचा मालक असलेल्या विकीने लग्नात अंकिताला मालदीवमध्ये कोट्यवधीचा एक व्हिला भेट म्हणून दिल्याची चर्चा आहेच. याशिवाय मुंबईत त्यानं 8 बीएचके फ्लॅटही घेतला आहे
11 / 11
या 8 बीएचके फ्लॅटमध्ये नुकताच अंकिताचा गृहप्रवेश झाला. विकीला महागड्या गाड्यांचीही आवड आहे. लँड क्रूझर आणि मर्सिडीज-बेंझ हे त्याच्या कार कलेक्शनमध्ये आहेत.
टॅग्स :अंकिता लोखंडे