Ankita Lokhande : "मी खूप पझेसिव्ह GF होते"; सुशांत सिंह राजपूतच्या डान्स पार्टनरला पाहून अंकिताचा जळफळाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 14:47 IST
1 / 8लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस 17' मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे तिचा पती विकी जैनसोबत आली आहे. पण, या शोमध्ये अंकिता अनेकदा तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलताना दिसत आहे.2 / 8आता पुन्हा एकदा अंकिता शोमध्ये सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलताना दिसली. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये अंकिताने एक आठवण सांगितली आहे. जेव्हा ती सुशांत सिंह राजपूतसोबत 'झलक दिखला जा' या डान्स रिएलिटी शोच्या सीझन 4 मध्ये होती.3 / 8बिग बॉसमुळे अंकिता आणि विकीची सतत चर्चा रंगलेली असते. अंकिता बिग बॉसच्या घराच्या गार्डन एरियामध्ये ईशा मालवीय आणि अभिषेक कुमारसोबत बोलत होती. याच दरम्यान, तिने सुशांत सिंह राजपूतची देखील पुन्हा एकदा आठवण काढली आहे. 4 / 8'झलक दिखला जा मध्ये टॉप 5 मध्ये राहूनही मी तितके लक्ष केंद्रित केलं नाही. बाहेर फिरायला जायचे. मी बर्याचदा निशांतला (झलक दिखला जा मधील अंकिता लोखंडेचा डान्स पार्टनर निशांत भट्ट) सांगायची की स्पर्धा सोडं आणि माझ्यासोबत बाहेर चल' असं अंकिताने सांगितलं.5 / 8अभिषेकने अंकिताला सुशांत सिंह राजपूतबद्दल विचारले, 'तो तिथपर्यंत कसा पोहोचला?' यावर अंकिताने सांगितले की, 'तो टॉप 2 मध्ये होता. मी त्याला म्हणाले की तू हार. जर तू जिंकलास तर खूप अडचणी येतील. त्याला शोमध्ये पहिल्यांदा 30 (पूर्ण स्कोअर) मिळाले, तेव्हा मी त्याला विचारलं की तुला पूर्ण गुण कसे मिळाले?'6 / 8ईशाने अंकिताला सुशांतच्या डान्स पार्टनरबद्दल विचारले. अंकिता म्हणाली, 'ती खूप चांगली डान्सर होती. एके दिवशी डान्स करत असताना ती त्याला बिलगली. हे पाहून माझा जळफळाट झाला.'7 / 8'मी खूप पझेसिव्ह गर्लफ्रेंड होती. आता थोडी ठीक आहे. म्हणजे नॉर्मल झाली आहे. आधी छोट्या छोट्या गोष्टींवर खूप राग यायचा. आता असं होत नाही'' असा किस्सा अभिनेत्रीने सांगितला आहे. 8 / 8सुशांत आणि अंकिताने पवित्र रिश्ताच्या सेटवर डेट करायला सुरुवात केली. त्यांनी सात वर्षे एकमेकांना डेट केलं आणि 2016 मध्ये ते वेगळे झाले. 2020 मध्ये अभिनेता त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला होता.