Join us  

देशातील प्रतिष्ठित उद्योगपतीच्या लेकीने केली बोल्डनेसची मर्यादा पार, हॉट फोटो पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 10:55 AM

1 / 10
आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांची लेक अनन्या बिर्ला ही संगीताच्या जगतातील प्रसिद्ध नाव आहे. संगीताबरोबरच इतर क्षेत्रामध्येही ती कुटुंबाचं नाव पुढे नेत आहे.
2 / 10
१७ जुलै १९९४ रोजी जन्मलेली अनन्या बिर्ला एक भारतीय गायिका, गीतकार आणि उद्योजक आहे. २०१६ मध्ये संगीताच्या जगतात पाऊल ठेवल्यानंतर अनन्याने अनेक दिग्गजांसोबत काम केले आहे. त्यांची फॅन फॉलोविंग वाढत जात आहे.
3 / 10
अनन्या भारतातील अशी एकमेव कलाकार आहे, जिच्या इंग्लिश सिंगलला प्लॅटिनम सर्टिफिकेट मिळालेलं आहे. कुठल्याही अल्बमच्या १ दशलक्ष कॉपी किंवा कुठल्यादी सिंगलच्या २ दशलक्ष कॉपी विकल्या गेल्यावर प्लॅटिनम सर्टिफिकेट मिळते. अनन्याच्या ५ सिंगल्सला प्लॅटिनम आणि डबल प्लॅटिनम स्टेटस मिळालेलं आहे.
4 / 10
२०२० मध्ये अनन्या लॉस एंजिल्समध्ये मेवरिक मॅनेजमेंटसोबत करार करणारी पहिली भारतीय आर्टिस्ट बनली. त्यानंतर तिने लेट देयर बी लव्ह आणि एव्हरीबडीज लॉस्ट प्रसिद्ध केले.
5 / 10
अनन्या स्वतंत्र मायक्रोफिनची संस्थापक आहे. ती ग्रामीण भागामध्ये महिलांना मायक्रोफायनान्स प्रदान करते. ती Ikai Asai ची संस्थापक आणि Mpower ची सहसंस्थापक देखील आहे.
6 / 10
तिला तिचे काम आणि उद्योजगतेसाठी पुरस्कारसुद्धा मिळाला आहे. तिला २०१८ च्या GQ मधील सर्वात प्रभावशाली भारतीयांमधील एक म्हणून स्थान देण्यात आले होते.
7 / 10
२०२० मध्ये तिने मानसिक आरोग्य, समानता, शिक्षण, वित्तीय समायोजन, वातावरणातील बदल आणि मदतकार्यासाठी अनन्या बिर्ला फाऊंडेशनची स्थापना केली होती.
8 / 10
अनन्या बिर्ला कुमार मंगलम बिर्ला यांची लेक आणि भारतीय क्रिकेटपटू आर्यमन बिर्ला यांची बहीण आहे.
9 / 10
अनन्या बिर्ला हिने लहान वयामध्येच संगीतामध्ये आवड निर्माण केली होती. ११ व्या वर्षी तिने संतूर वाजवणे शिकून घेतले होते.
10 / 10
अनन्या हिने पदवी मिळवण्यासाठी ऑस्कफर्ड विद्यापीठामध्ये अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन या विषयांचा अभ्यास केला. मात्र डिग्री पूर्ण करण्यापूर्वीच शिक्षण सोडलं.
टॅग्स :सेलिब्रिटीकुमार मंगलम बिर्लापरिवारव्यवसाय