Join us
Daily Top 2Weekly Top 5

Amitabh Bachchan : गाड्यापासून ते बंगल्यापर्यंत! अमिताभ बच्चन यांच्याकडे आहे कोट्यावधींची प्रॉपर्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 15:08 IST

1 / 9
बॉलिवूडचे शेहनशहा, बिग बी, बच्चन साहब अशा कितीतरी नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांचा आज वाढदिवस आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 9
गेल्या कित्येक वर्षांमध्ये प्रसिद्धीसोबतच त्यांनी संपत्तीदेखील कमावली आहे. त्यामुळे कलाविश्वातील श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीत त्यांचं नाव कायम अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळतं. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 9
अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आज कलाविश्वात कार्यरत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे बच्चन कुटुंबाविषयी चाहत्यांना कायमच आकर्षण असल्याचं दिसून येतं. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 9
बच्चन यांच्या कुटुंबाविषयी, त्यांच्या संपत्तीविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यामुळेच आज अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती किती आहे हे आज जाणून घेऊयात. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 9
अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती 2,950 कोटी रूपयांची असल्याचं बोललं जात आहे. तसेच जया आणि अमिताभ बच्चन यांच्याकडे जवळपास ६२ कोटी रुपयांचे दागदागिने आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 9
caknowledge.com ने दिलेल्या रिपोर्टनुसार अमिताभ बच्चन यांचं उत्पन्न हे चित्रपट, टेलीविजन आणि ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून येतं. त्यांची संपत्ती ही 2,950 कोटी रूपये असल्याचा खुलासा या रिपोर्टमधून करण्याता आला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 9
अमिताभ बच्चन हे एका जाहिरातीसाठी जवळपास 5 ते 6 कोटी रूपयांचं मानधन घेतात. यांच्याकडे मुंबईत चार बंगले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
8 / 9
अमिताभ यांना महागड्या गाड्यांचीही आवड आहे. त्यांच्याकडे 15 पेक्षा जास्त गाड्या आहेत. त्यात BMW, मर्सिडीज आणि रेंज रोवर यांसारख्या अनेक गाड्यांचा समावेश आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
9 / 9
अमिताभ यांनी याआधीच घोषणा केलेली आहे की त्यांच्या संपत्तीत मुलगा अभिषेक आणि मुलगी श्वेता या दोघांचाही समान हक्क असेल.(फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :अमिताभ बच्चनअभिषेक बच्चनजया बच्चन