ऐश्वर्याची नणंद श्वेता बच्चन कधीकाळी होती सलमानची ‘दीवानी’, सतत सोबत ठेवायची त्याची ही आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 11:21 IST
1 / 10अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता नंदा आज (17 मार्च) तिचा वाढदिवस साजरा करतेय. श्वेता फिल्मी दुनियेत नाही. पण म्हणून फिल्मी दुनियेशी तिचे नाते नाहीच, असे मात्र मुळीच नाही. ग्लॅमर दुनियेपासून दूर असली तरी श्वेता कायम चर्चेत असते.2 / 10फिल्मी दुनियेतील ग्लॅमरसोबत लहानाची मोठी झालेली श्वेता पेशाने ज्वेलरी डिझायनर असून ती या क्षेत्रातील बरेच मोठे नाव आहे. श्वेताची आई आणि वडील दोघेही अभिनयक्षेत्रात प्रसिद्ध असले तरी तिने नेहमीच अभिनयापासून दूर राहाणेच पसंत केले होते. ती आई-वडिलांसोबत फिल्मी पार्ट्यांना हजेरी लावत असली तरी कॅमेºयासमोर न येण्याचेच तिने ठरवले होते.3 / 10 शाळेत असताना नाटकांमध्ये श्वेता भाग घ्यायची. त्यात एकदा एका नाटकावेळी ऑनस्टेज तिचा डायलॉग विसरली आणि तो क्षण तिचा अभिनयाचा शेवटचा ठरला. 4 / 10पूर्ण दिवस रिहर्सल करून देखील ती डायलॉग विसरली हीच गोष्ट तिच्या मनात ठासून राहिली. कधीच चांगला अभिनय करू शकणार नाही स्टार्ट, साउंड, कॅमेरा, एक्शन... या शब्दांची जणू भीतीच तिच्या मनात बसली आणि घरच्यांची पूर्ण परवानगी असूनही तिने या क्षेत्रापासून लांबच राहणे पसंत केले.5 / 10लहान असताना श्वेता अनेकदा आई-बाबासोबत चित्रपटाच्या सेटवर जायची. या श्वेताचा टीनेज क्रश कोण होता माहितीये? तर सलमान खान.6 / 10होय, कॉफी विद करण या चॅट शोमध्ये खुद्द श्वेताने याचा खुलासा केला होता. श्वेता सलमानची जबरदस्त फॅशन होती.7 / 10सलमानवरचे तिचे प्रेम कुटुंबालाही ठाऊक होते. त्यामुळेच अभिषेक बच्चन श्वेतासाठी खास सलमानने ‘मैंने प्यार किया’मध्ये घातली होती, तशी कॅप घेऊन आला होता. तेव्हापासून ही कॅप घालूनच श्वेता झोपायची.8 / 10बोर्डिंग स्कूलमध्ये असताना श्वेताने सलमानचा ‘मैंने प्यार किया’ हा सिनेमा बघितला होता.9 / 10शाळेत सिनेमे पाहण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे तिने एक टेप रेकॉर्डर घेऊन अख्खा ‘मैंने प्यार किया’चा आॅडिओ रेकॉर्ड केला होता. मग रोज ती हा सिनेमा ऐकायची.10 / 10श्वेताचा टिनेज क्रश असलेला हाच सलमान कधीकाळी ऐश्वर्या रायच्या प्रेमात होता. त्यांचे अफेअर खूप गाजले होते. पुढे हीच ऐश्वर्या श्वेताची वहिनी झाली, हा मोठा योगायोग म्हणता येईल.