Allu Arjun : ७ कोटींच्या व्हॅनिटी व्हॅनपासून ते रेंज रोव्हर, अल्लू अर्जुन आहे या ५ लक्झरी कार्सचा मालक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 12:15 IST
1 / 6'पुष्पा'मुळे साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन याला खूप जास्त लोकप्रियता मिळाली आहे. स्टायलिश स्टार म्हणून लोकप्रिय असलेला अल्लू अर्जुन आता केवळ साऊथ पुरता सुपरस्टार राहिलेला नाही. तो देशभरात लोकप्रिय झाला आहे. त्यामुळे त्याच्या फॅन्सना त्याच्याविषयी अजून जाणून घेण्याची इच्छा आहे. अल्लू अर्जुन स्टायलिश लाइफस्टाईल जगतो. हे त्याच्या गॅरेजमधील कार कलेक्शनवरून सांगता येतं. 2 / 6रेंज रोव्हर वोग - अल्लू अर्जुनकडे एकापेक्षा एक लक्झरी कार्स आहेत. त्यातील एक म्हणजे रेंज रोव्हर वोग. ही कार त्याने २.५ कोटी रूपयांना विकत घेतली होती. ही कार सामान्यपणे सर्वत सेलिब्रिटींची आवडती कार आहे. ही कार १.८८ कोटी ते ४ कोटी दरम्यान मिळते. 3 / 64 / 6हमर एच२ - फार कमी सेलिब्रिटींकडे ही धाकड कार असेल. अल्लू अर्जुन हा त्याच्या वेगळ्या चॉइससाठी चांगलाच लोकप्रिय आहे. ही कार त्याने ७५ लाख रूपयांमध्ये खरेदी केली होती. 5 / 6जागुआर एक्सजेएल - अल्लू अर्जुनकडे ही क्लास कारही आहे. ही कार तो नेहमीच सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान किंवा इव्हेंट्सला जाताना वापरतो. या कारची किंमत १.२ कोटी रूपये आहे.6 / 6Volvo XC90 Excellence - ही एक लक्झरी कार अल्लू अर्जुनच्या कलेक्शनमध्ये आहे. ही कार आपल्या स्पीडसाठी ओळखळी जाते. या कारला ओपन रूफ आहे. या कारची किंमत १.३० ते १.३५ कोटी रूपये इतकी आहे.