ड्रग्ज पार्टीत ताब्यात घेण्यात आलेला शाहरुखचा मुलगा आर्यन खान नेमकं काय करतो? वाचा सारंकाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 12:48 IST
1 / 10मुंबईच्या समुद्रात एका क्रूझवर ड्रग्ज पार्टी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी उधळून लावली. यात आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये बड्या उद्योगपतींच्या मुलींचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला देखील ताब्यात घेण्यात आल्याच्या माहितीला अधिकृत दुजोरा एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी दिला आहे. 2 / 10ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान याचं नाव समोर आल्यानं बॉलीवूड विश्वात खळबळ उडाली आहे. अभिनेता शाहरुख खान बॉलीवूडचा 'बादशहा' म्हणून ओळखला जातो. पण आर्यन खान नेमकं काय करतो? तो अद्याप बॉलीवूडमध्ये का दिसला नाही? याबाबत आपण जाणून घेणार आहोत. 3 / 10आर्यन खान हा शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी यांचा मोठा मुलगा आहे. त्याला एक लहान बहिण आणि भाऊ देखील आहे. सुहाना खान आणि अबराम अशी त्यांची नावं आहेत. २०१९ साली आर्यन खान यानं 'लायन किंग'च्या हिंदी डब चित्रपटासाठी आवाज दिला होता. 4 / 10आर्यन खान यानं 'लायन किंग' चित्रपटातील सिंबा भूमिकेसाठी आवाज दिला होता. त्याचा आवाज अगदी शाहरुख सारखाच असल्याच्या प्रतिक्रिया तेव्हा चाहत्यांनी व्यक्त केल्या होत्या. शाहरुखनं २०१९ सालच्या क्रिकेट वर्ल्डकपवेळी अनोख्या पद्धतीनं आर्यन खानच्या 'लायन किंग'चं प्रमोशन केलं होतं. शाहरुख आणि आर्यन यांनी टीम इंडियाच्या रंगाची जर्सी परिधान केली होती. त्यावर 'सिंबा' आणि 'मुसाफा' या भूमिकांची नावं लिहिली होती.5 / 10शाहरुख खान बॉलीवूडचा 'बादशहा' म्हणून ओळखला जात असला तरी त्याच्या मुलाला म्हणजेच आर्यनला अभिनय क्षेत्रात करिअर करायचं नाही. खुद्द शाहरुखनं एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली होती. 'तो हँडसम आहे, उंच आहे पण तो अभिनय क्षेत्रात येईल असं वाटत नाही. त्याचं लेखन खूप चांगलं आहे. त्याला अभिनयापेक्षा दिग्ददर्शनात रस आहे', असं शाहरुख म्हणाला होता. 6 / 10आर्यन खान बॉलीवूड सुपरहिट 'कभी खुशी कभी गम' चित्रपटात दिसला होता. चित्रपटात राहुल नावाची भूमिका साकारणाऱ्या शाहरुख खान याचं बालपणीचं पात्र म्हणून चिमुकल्या आर्यन खानला दाखवण्यात आलं होतं. जया बच्चन यांच्या हातात दिसणारा तो गोंडस चिमुकला दुसरा तिसरा कुणी नसून आर्यन खान होता. 7 / 10आर्यन खान आणि अभिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली यांची खूप चांगली मैत्री आहे. दोघं एकमेकांना डेट करत असल्याचीही चर्चा बॉलीवूड विश्वात रंगली होती. त्यानंतर खुद्द नव्या नवेली हिनं सर्व चर्चा फेटाळून लावल्या होत्या आणि आर्यन फक्त एक चांगला मित्र असल्याचं तिनं म्हटलं होतं. 8 / 10आर्यन खान याचं नुकतंच कॅलिफोर्नियातील विद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं आहे. मे महिन्यात त्याचा पदवीग्रहण करतानाचा एक फोटो देखील सोशल मीडियात व्हायरल झाला होता. 9 / 10आर्यन खान यानं कॅलिफोर्नियातील स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्टमधून फाइन आर्ट, सिनेमॅटिक आर्ट, फिल्म आणि टेलिव्हिजन प्रोडक्शन विभागातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तर २०१६ साली त्याचं लंडनमधील सेव्हन ओक हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण झालं होतं. 10 / 10आर्यन खान यानं तायक्वांदो आणि कराटेचंही प्रशिक्षण घेतल्याचीही माहिती समोर आली होती.