Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुणाचं वय ५ वर्षांनी मोठं, तर कुणाचं 10 वर्षांनी; 'या' अभिनेत्री आहेत नवऱ्यापेक्षा वयाने मोठ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 16:16 IST

1 / 9
आपल्या समाजात जेव्हा कधी लग्नाची चर्चा होते तेव्हा आजही मुला-मुलीची जात, रंग, वय पाहूनच पाऊल उचलले जाते. मात्र, अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी समाजाच्या या नियमांना न झुमानता स्वत:चा मार्ग तयार केला आहे. इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्यापेक्षा लहान वयाच्या तरुणाशी लग्न केले. जाणून घेऊया कोण आहेत त्या.
2 / 9
नम्रता शिरोडकर ही सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती बराच काळ अभिनय जगतापासून दूर असली तरी सध्या ती आपल्या घरात खूप आनंदी आहे. तिने साऊथचा सुपरस्टार महेश बाबूसोबत लग्नगाठ बांधली. नम्रता महेशपेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे.
3 / 9
बॉलिवूडमधील पावर कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचं ही नाव या लिस्टमध्ये आहे. कतरिना विकी कौशलपेक्षा ५ वर्षांनी मोठी आहे.
4 / 9
नेहा धूपिया आणि अंगद बेदीने 2018मध्ये गुपचूप लग्न केलं होते. अंगद नेहाहून 2 वर्षांनी लहान आहे.
5 / 9
उर्मिला मातोंडकर ही देखील अशा बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे जिने खूप उशीरा लग्न केलं. मोहसीन अख्तर मीर असे तिच्या पतीचे नाव आहे. जो उर्मिलापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे. म्हणजेच उर्मिला मोहसीनपेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे.
6 / 9
पती कुणाल खेमू पेक्षा सोहा अली खान मोठी आहे. कुणालपेक्षा सोहा 4 वर्षांनी मोठी आहे.
7 / 9
'द कपिल शर्मा' शोमध्ये जजची भूमिका साकारणाऱ्या अर्चना पूरण सिंगने आपल्या पेक्षा 7 वर्षांनी लहान असलेल्या परमीत सेठीसोबत लव्ह मॅरेज केलं आहे.
8 / 9
प्रियंका चोप्रा आणि निक जोनासच्या जोडीला एक पावर कपल म्हणून ओळखलं जातं. प्रियंका चोप्रा निक जोनासपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे.
9 / 9
बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या रायसुद्धा पती अभिषेक बच्चनपेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे.
टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनप्रियंका चोप्रानम्रता शिरोडकरउर्मिला मातोंडकरनेहा धुपिया