कोण आहे ऐश्वर्याची वहिनी श्रीमा राय? भावजयसोबत खटके उडाल्याची रंगतेय चर्चा; पाहा Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 16:30 IST
1 / 7अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) कुटुंबापासून दुरावल्याची चर्चा आहे. अभिषेक-ऐश्वर्या घटस्फोट घेणार असंही गॉसिप बीटाऊनमध्ये सुरु आहे. ऐश्वर्याचं सासरच्या मंडळींसोबत बिनसलं आहे.2 / 7दरम्यान ऐश्वर्याचे माहेरच्यांसोबतही खटके उडाल्याची चर्चा आहे. ऐश्वर्याची वहिनी श्रीमा रायच्या (Shrima Rai) सोशल मीडियावर कमेंट्सवरुन सर्वांनी तसा अंदाज बांधलाय. काही दिवसांपूर्वी श्रीमाच्या वाढदिवसासाठी ऐश्वर्याची नणंद श्वेता बच्चनने श्रीमासाठी फुलांचा गुच्छ पाठवला. यामुळे श्रीमा राय चर्चेत आली.3 / 7श्रीमा रायला ऐश्वर्याच्या प्रसिद्धीमुळे ईर्ष्या वाटते असे कमेंट्स तिच्या पोस्टवर येतात. यावर श्रीमाचं उत्तरंही अगदी सूचक असतं. तुम्हाला माहितीये का ऐश्वर्याची वहिनी श्रीमा कोण आहे आणि ती काय करते?4 / 7श्रीमा राय एक फॅशन ब्लॉगर, कंटेंट क्रिएटर आहे. स्वत:बद्दलची माहिती देत तिने आज पोस्ट करत लिहिले,'ब्लॉगर होण्याआधी मी काही वर्ष वेल्थ मॅनेजमेंटमध्ये बँकर होते. मी २००९ साली मिसेस इंडिया ग्लोब जिंकली आहे. २०१७ नंतर मी व्लॉगिंगला सुरुवात केली. दुसऱ्यांचं नाव वापरुन मी कधीच स्वत:चं नाव कमावलं नाही.'5 / 7श्रीमा दिसायला एखाद्या अभिनेत्रीप्रमाणेच सुंदर आहे. तिला दोन मुलंही आहे. कुटुंबासोबत अनेकदा ती फोटो शेअर करत असते. सासूसोबतही तिचा छान बाँड आहे.6 / 7श्रीमाचा नवरा म्हणजेच ऐश्वर्याचा भाऊ आदित्य राय मर्चंट नेव्हीमध्ये आहे. आदित्य आणि श्रीमा अमेरिकेत स्थायिक असून त्यांना विहान आणि शिवांश ही दोन मुलेदेखील आहेत.7 / 7श्रीमाचे अनेक अभिनेत्रींसोबतही फोटो असतात. यावरुन तिला ऐश्वर्यासोबत कधीच फोटो पोस्ट करत नाहीस अशा कमेंट्स आल्या. ट्रोलर्सला उत्तर देत तिने ऐश्वर्यावरच निशाणा साधत म्हटले की ऐश्वर्याचे फोटो पाहण्यासाठी तिच्या अकाऊंटवर जा. कारण त्यावर फक्त तिचेच फोटो असतात आमच्यासोबत नसतात.