अंबानींच्या शाळेत शिकते आराध्या बच्चन, एका वर्षाची फी पाहून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 18:23 IST
1 / 7ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची लेक आराध्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बच्चन कुटुंबाच्या घरची लेक आराध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असते. 2 / 7ऐश्वर्या आपल्या लेकीला प्रत्येक कार्यक्रमाला सोबत घेऊन जाते. कधी बॉलिवूड पार्टी तर कधी अंबानींच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी गेलेल्या मायलेकी एकत्र स्पॉट होताना दिसतात. 3 / 7आराध्या अमिताभ बच्चन यांचीही लाडकी आहे. नातीबरोबर बिग बींचे अगदी प्रेमाचे संबंध आहेत. अनेकदा बिग बी सोशल मीडियावरही लाडकी नात आराध्याबरोबरचे फोटो शेअर करताना दिसतात. 4 / 7बच्चन कुटुंबियांची लाडकी लेक आराध्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते. या शाळेत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि उद्योगपतींची मुलं शिक्षण घेतात. 5 / 7नावाप्रमाणेच अंबानींच्या स्कूलची फीदेखील एकदम सेलिब्रिटींना शोभेल अशीच आहे. शिशूवर्गापासून ते ७वी पर्यंत या शाळेत १ लाख ७० हजार फी आकारली जाते. तर ८वी ते १२वी साठी ४ ते १२ लाखपर्यंत फी आहे. 6 / 7आराध्याचे शाळेतील काही फोटोही व्हायरल झाले होते. मेकअप करुन शाळेत गेल्यामुळे आराध्याला ट्रोल केलं गेलं होतं. 7 / 7ऐश्वर्या आणि अभिषेकने २००७ साली लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. लग्नानंतर चार वर्षांनी ऐश्वर्या आणि अभिषेक आईबाबा झाले. १६ नोव्हेंबर २०११ला आराध्याचा जन्म झाला. ती ११ वर्षांची आहे.