Riteish-Genelia Deshmukh: लग्नानंतर या गोष्टीला कंटाळली होती जिनिलिया, रडत रडत रितेशकडे केली होती तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 18:47 IST
1 / 9रितेश देशमुख आणि जिनिलिया हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. हे कपल नेहमीच एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, रितेशसोबत लग्न झाल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच जेनेलिया रडायला लागली होती.2 / 9जिनिलिया डिसूझा आणि रितेश देशमुख यांच्या लग्नाला बरीच वर्षे झाली आहेत, पण तरीही दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. जिनिलिया आणि रितेशचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. 3 / 9एकदा अभिनेत्रीने तिच्या लग्नाशी संबंधित एक मजेदार घटना शेअर केली होती. खरं तर, जिनिलियाने सांगितले होते की, लग्नाच्या एका महिन्यानंतरच ती एका गोष्टीला कंटाळली होती. हा रंजक किस्सा तिने सांगितला होता.4 / 9जिनिलियाचे लग्न पारंपरिक मराठी कुटुंबातील रितेश देशमुखसोबत झाले आहे. त्यामुळे तिला लग्नानंतर दररोज नटून थटून राहायला पाहिजे, असे वाटले. ती रोज सकाळी सलवार कमीजसोबत भारी दागिने घालून तयार व्हायची. तिला असे पाहून रितेशही चकीत व्हायचा. पण जिनिलियाला हे सांभाळता आले नाही आणि एकेदिवशी तिला रडू कोसळले.5 / 9जिनिलियाने लेडीज वर्सेस जेंटलमेन सीझन २ या शोमध्ये ही संपूर्ण कहाणी सांगितली होती. अभिनेत्री म्हणाली होती, 'जेव्हा मी लग्न केले, तेव्हा मला वाटले की ही रित आहे. मी रोज सकाळी नटून थटून तयार व्हायचे आणि मला असे कपडे घालण्याची गरज का आहे याची चिडचिड व्हायची.”6 / 9जिनिलियाचे म्हणणे ऐकल्यानंतर रितेशने खुलासा केला की तिला सलवार कमीज आणि ज्वेलरीमध्ये पाहिल्यानंतर तोही गोंधळला होता आणि कदाचित काही पूजा असेल.7 / 9जेनेलिया पुढे म्हणाली, “एक दिवस मी कंटाळले आणि म्हणाले, 'मी हे करू शकत नाही. हे ऐकून रितेश गोंधळला, तो म्हणाला, 'काय करतेस?' त्यावर जिनिलिया म्हणाली, 'मी रोज असे कपडे घालू शकत नाही.' यावर रितेश म्हणाला होता की, मी पण विचार करत होतो की तू रोज असे का कपडे घालतेस!8 / 9रितेश आणि जिनिलियाने १० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी ३ फेब्रुवारी, २०१२मध्ये लग्न केले. दोघांना रियान आणि राहिल हे दोन मुले आहेत.9 / 9लग्नानंतर रितेश आणि जिनिलिया वेड या चित्रपटात झळकले होते. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली.