Join us  

वयाची पन्नाशी गाठल्यानंतर अमिषा पटेलला या अभिनेत्यासोबत करायचं लग्न, व्यक्त केली इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2023 7:32 PM

1 / 9
मागील काही दिवसांपासून सिनेइंडस्ट्रीपासून दूर असलेल्या अमिषा पटेलने नुकतेच ६३ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यात तिने टॉम क्रूझसोबत लग्न करायची इच्छा व्यक्त केली.
2 / 9
६३ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर अमिषाला प्रश्न विचारण्यात आला की, कोणत्या अभिनेत्रीची जागा घ्यायची वेळ आली तर कोणत्या अभिनेत्रीची जागा घेशील? या प्रश्नाचं उत्तर देत अमिषा म्हणाली, मी कोणत्याही अभिनेत्रीची जागा घेऊ शकते. पण हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझने माझ्यासोबत स्क्रीन शेअर करावी.
3 / 9
अमिषा पुढे म्हणाली की, हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझची मी मोठी चाहती आहे. त्याच्यासोबत लग्न करण्याची माझी इच्छा आहे.
4 / 9
ती म्हणाली की, तरुणपणी माझ्या खोलीत मी टॉम क्रूझचे पोस्टर्स लावले होते. अमीषाच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
5 / 9
टॉम क्रूझबद्दल बोलताना अमिषाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत आहे. पन्नाशी गाठल्यानंतर अमीषाला टॉम क्रूझसोबत लग्न करायचे असल्यामुळे चाहते तिला ट्रोल करत आहेत.
6 / 9
अमीषा पटेल तिच्या अभिनयाव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती कलाविश्वापासून दूर होती. पण नुकत्याच पार पडलेल्या ६३ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अमीषा पटेलने आपल्या खास अंदाजात हजेरी लावली.
7 / 9
काळ्या रंगाचा गाउन, न्यूड मेकअप आणि हटके कानातळ्यांमुळे अमीषा खूपच सुंदर दिसत होती. 'गदर' या चित्रपटासाठी अमिषा पटेल ओळखली जाते. अनेक वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला हा चित्रपट चांगलाच गाजला. आता २२ वर्षांनंतर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
8 / 9
'गदर २'मध्ये अमीषा आणि सनी देओल पुन्हा एकदा तारा आणि सकीनाच्या भूमिकेत दिसणार आहेत. उर उत्कर्ष शर्मा त्यांच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे.
9 / 9
या सिनेमात प्रेक्षकांना थरार, नाट्य पाहायला मिळणार आहे. ११ ऑगस्ट २०२३ रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
टॅग्स :अमिषा पटेल