मृणाल दुसानिसनंतर आणखी एका प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा सिनेइंडस्ट्रीला रामराम?, अन् परदेशात झाली स्थायिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 07:30 IST
1 / 9माझिया प्रियाला प्रीत कळेना, तू तिथे मी या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री मृणाल दुसानिस ही गेल्या काही वर्षांपासून सिनेइंडस्ट्रीपासून दुरावली आहे. त्यानंतर आता आणखी एक मराठी अभिनेत्री देखील सिनेइंडस्ट्रीतून ब्रेक घेत परदेशात स्थायिक झाली आहे.2 / 9ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून अग्गंबाई सूनबाई मालिकेतील अभिनेत्री उमा पेंढारकर. 3 / 9उमा पेंढारकर सध्या न्यूझिलंडमध्ये राहते आहे. इतकेच नाही तर ती वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे.4 / 9उमा पेंढारकर ही टेलिव्हिजन विश्वापासून दूर जाऊन काही दिवसांसाठी न्यूझीलंडला राहायला गेली आहे. तिचा पती तिथे स्थायिक असतो.5 / 9उमा पेंढारकरने तिथे मानसिक स्वास्थ्यासाठी मोफत समुपदेशन करायला सुरुवात केली आहे.6 / 9सध्या ती न्यूझीलंडमध्ये असून सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना तिच्या ट्रिपबद्दलचे अपडेट्स देत आहे.7 / 9अभिनेत्री असण्याबरोबरच उमा समुपदेशकही आहे. तिने काउन्सिलिंग सायकॉलॉजीमध्ये मास्टर्स केले आहे.8 / 9 उमाचा स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे. त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ती मेकअप, स्कीनकेअर आणि मानसिक स्वास्थ्य यांबद्दल विविध टिप्स देत असते. 9 / 9उमा पेंढारकर स्वामिनी, अगंबाई सूनबाई, योग योगेश्वर जयशंकर या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.